महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करत 50 बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची सत्ता पलटवली अन ते मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची नजर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर असल्याचे बोलले जातेय. कारण भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातील 200 आमदार मतदान करतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावरून आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिशन-२००’ हातात घेतले आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाकडे एकूण 170 आमदार आहेत. शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यापासून आमदारांची संख्या 185 वर गेली आहे.अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले 200 आमदारांचे लक्ष्य गाठण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवर नजर ठेवून आहेत का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांना आश्वासन पूर्ण करण्यासाठी 15 आमदारांच्या मतांची गरज आहे. त्यामुळे ते काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांवर नजर ठेवून आहेत.अशी चर्चा आहे.आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेत काँग्रेस चे ४४ तर राष्ट्रवादी चे ५३ आमदार आहेत.
अशा स्थितीत अध्यक्षपदासाठी आणखी 15 आमदार कोणत्या पक्षाचे असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
यामुळे दोन्ही काँग्रेस मध्ये मात्र चिंताजनक वातावरण तयार झाल्याचे बोलले जात आहे.
मंत्री मंडळाचा होणार विस्तार
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विरोधक टीका करू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. यातील पहिला टप्पा येत्या काही दिवसात होईल आणि यात १० ते १२ मंत्री शपथ घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल
मुलगा होण्याचा नवस पूर्ण वडिलांनी मंदिरात नेऊन तरुणाचा नरबळी दिला
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 17, 2022, 13:48 PM
WebTitle – Eknath shinde eyes on 15 MLAs of Congress and rashtrawadi congress