आम आदमी पक्षाचे (आप) मंत्री आतिशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आणि केंद्रीय तपास यंत्रणा ईडी (अंमलबजावणी संचालनालय) वर गंभीर आरोप केले. ईडी ने साक्षीदारांचे जबाब नोंदवून डिलिट मारले असं त्या म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली साक्षीदारांची चौकशी करायची आहे आणि त्याचा ऑडिओ-व्हिडिओ सुरक्षित ठेवावा लागेल. त्याऐवजी ईडी ने साक्षीदाराच्या जबाबाचे ऑडिओ रेकॉर्डिंग काढून टाकले आहे.आता आतिशी यांनी ईडीला रेकॉर्डिंग देशासमोर सादर करण्याचे आव्हान दिले आहे.

ईडी ने साक्षीदारांचे जबाब नोंदवून डिलिट मारले
यावेळी स्पष्टीकरण देताना आतिशी म्हणाल्या, ” एका आरोपीने काही दिवसांपूर्वी कोर्टात अर्ज केला आणि सांगितले की मला सीसीटीव्ही फुटेज हवे आहे. त्याने अर्ज का केला? कारण ईडीने आरोपीला सरकारी साक्षीदारासमोर उभे केले.या काळात प्रश्नोत्तरे झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी निवेदने देण्यात आली होती. त्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. जेव्हा तिथं घडलेल्या चौकशीतून (सवाल जवाब) जे बाहेर आलं ते न्यायालयात सादर केले गेले तेव्हा आरोपीच्या लक्षात आले की खोलीत जे काही घडले होते आणि कागदावर आता जे काही दिसते आहे यात फरक आहे.”
ईडी ने चौकशीचा जबाब ऑडिओ डिलिट केला
आतिशी म्हणाल्या, “हे घडल्यामुळे आरोपींनी सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी अर्ज केला. ईडीने ते फुटेज दिले मात्र तेव्हा त्यांनी त्या फुटेजचा ऑडिओ डिलीट केला.आरोपीला फक्त व्हिडिओ फुटेज देण्यात आले. त्या खोलीत काय घडले याचे सर्व पुरावे ईडीने हटवले.” जेव्हापासून (एक्साइज पॉलिसी) अबकारी धोरणाची चौकशी सुरू झाली आहे, तेव्हापासून आम आदमी पक्षाकडे विश्वसनीय सूत्रांकडून ही बातमी आहे. गेल्या दीड वर्षातील सर्व चौकशी आणि प्रश्न-उत्तरांचे ऑडिओ फुटेज ईडीने हटवले आहे.“
हे काय दाखवते? एक तर वसुली झाली नाही, पुरावे मिळाले नाहीत आणि निवेदनेही बनावट आहेत.
कारण विधाने खोटी नसतील तर ऑडिओ डिलीट करण्याची काय गरज होती?
आप ला घाबरवण्यासाठी ईडी छापे टाकत आहे
आतिशी म्हणाल्या, “मी कालच सांगितले होते की मी मंगळवारी सकाळी १० वाजता ईडी संदर्भात ‘स्फोटक खुलासा’ करणार आहे.हा खुलासा रोखण्यासाठी आणि आम आदमी पार्टीला घाबरवण्यासाठी ईडी सकाळी ७ वाजल्यापासून छापे टाकत आहे. ‘आप’च्या नेत्यांना गेल्या दोन वर्षांपासून धमक्या दिल्या जात आहेत. शेकडो छापे टाकूनही ईडीला काहीही, एक रुपयाही वसूल करता आला नाही.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 06,2024 |16:15 PM
WebTitle – ED records statements of witnesses and deletes them – Atishi’s serious allegations