आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य डॉ.शीतल आमटे -करजगी यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे.
बाबा आमटे यांच्या नात
चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल करजगी यांची आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटेकरजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
काही दिवसांपूर्वी आमटे परिवारातील कौटुंबिक वाद समोर आला होता,
त्या नैराश्यग्रस्त असून तनावात असल्याचे आमटे कुटुंबियानी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केले होते.
सोशल मिडियातून डॉ. शीतल यांना श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्त केली जात आहे.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)