मुंबई 10-01-2025 : लंडनहून मुंबईत दाखल होताच सामाजिक-राजकीय भाष्यांसाठी ओळखले जाणारे संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नीला पहाटे सुमारे दोन वाजल्यापासून पोलिस चौकशीच्या नावाखाली रोखून ठेवण्यात आले आहे. या कारवाईबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, ही संपूर्ण प्रक्रिया अन्यायकारक आणि छळवादाच्या स्वरूपाची असल्याचा आरोप केला जात आहे.एका भाजपा पदाधिकारी निखिल भामरे ने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रसिद्ध वकील आणि कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांची पोस्ट
असीम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,संग्राम पाटील हे सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. ते सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. भारतीय प्रवासी समुदायात, विशेषतः लंडनमधील भारतीयांमध्ये, त्यांचे नाव अग्रगण्य मानले जाते. सामाजिक प्रश्न, लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय उत्तरदायित्व यासंदर्भात त्यांनी सातत्याने स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांच्या या सार्वजनिक भूमिकांमुळे ते अनेकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून त्यांच्याकडून “चांगल्या वागणुकीचा बॉण्ड” लिहून घेण्याची शक्यता असून,
काही अटी व शर्ती घालून त्यांना सोडण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत.
मात्र, कोणताही गुन्हा नोंद नसताना आणि कोणतेही ठोस कारण स्पष्ट न करता दीर्घकाळ ताब्यात ठेवणे,
हे कायद्याच्या चौकटीत बसते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी त्यांच्याशी निकट संबंध असलेल्या व्यक्तींनी चिंता व्यक्त करत सांगितले की, संग्राम पाटील यांच्या संपर्कात सातत्याने राहण्यात येत आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत आवश्यक भासल्यास तातडीने ती उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली जातील. तसेच, पोलिस यंत्रणेने कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये, अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांचे हक्क आणि देशात आगमन करताना होणाऱ्या पोलिस कारवाईच्या मर्यादा यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत सरकार किंवा सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप यापूर्वीही अनेक वेळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संग्राम पाटील यांच्यावरील कारवाई ही केवळ चौकशीपुरती मर्यादित राहते की त्यातून अटक किंवा पुढील कायदेशीर प्रक्रिया उद्भवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या तरी, त्यांना अटक केली जाणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मात्र, या प्रकरणाचा शेवट काय होतो, पोलिस प्रशासन यावर कोणती अधिकृत भूमिका घेते
आणि या घटनेचे राजकीय व कायदेशीर परिणाम काय असतील,
हे आगामी काळात स्पष्ट होईल. या घटनेने देशातील नागरी स्वातंत्र्यांच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत.
कागदपत्र 18/12/2025 रोजी दिलेले उत्तर/जबाब आहे.
यात तक्रारदाराने (बीजेपी महाराष्ट्र प्रदेशाशी संबंधित सोशल मीडिया समन्वयक असल्याचा उल्लेख)
काही Facebook पोस्ट्स संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे.
अटकेचे / पोलिस कारवाईचे नमूद कारणे:
सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह मजकूर
तक्रारीनुसार,
– “शहर विकास आघाडी” या Facebook ID वर
– तसेच Dr. Sangram Patil यांच्या Facebook अकाउंटवर
दिनांक 14/12/2025 रोजी पोस्ट केलेला मजकूर हा कथितपणे:
– भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांविरोधात
– पक्षाची प्रतिमा मलीन करणारा
– द्वेष, तिरस्कार आणि तेढ निर्माण करणारा
– चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवणारा
असा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिला संदर्भातील आक्षेप
तक्रारीत असेही नमूद आहे की त्या आक्षेपार्ह मजकुरामध्ये एका महिलेसंदर्भात आक्षेपार्ह लेखन असल्याचा आरोप आहे,
जो कायद्याच्या दृष्टीने गंभीर मानला जातो.मात्र प्रथमदर्शनी तक्रारीत तसे काही स्पष्ट आढळून येत नाही.
सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप
तक्रारीनुसार या पोस्ट्समुळे:
– समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्वाची भावना
– पक्ष समर्थक व विरोधकांमध्ये द्वेष
– सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता
निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक पुरावे
– संबंधित Facebook पोस्ट्सचे screenshots काढून
– ते तक्रारीसोबत साक्ष म्हणून जोडण्यात आलेले आहेत.
– पोस्ट्सचे थेट links जबाबात नमूद करण्यात आले आहेत.
कायदेशीर चौकट (अप्रत्यक्ष संकेत)
– भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) अंतर्गत धर्म, जात, भाषा किंवा इतर कारणांवरून समाजात द्वेष, शत्रुता पसरवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती, अफवा किंवा सनसनाटी बातम्या (ऑनलाइन/इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही) पसरवणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होते, ज्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकतो.
थोडक्यात निष्कर्ष:
डॉ.संग्राम पाटील यांच्यावरील पोलिस कारवाईचे मूळ कारण हे कोणतेही प्रत्यक्ष गुन्हेगारी कृत्य नसून,
सोशल मीडियावर केलेल्या कथित राजकीय-आलोचनात्मक पोस्ट्स आहेत.
त्या पोस्ट्स “द्वेष पसरवणाऱ्या, पक्षाची प्रतिमा खराब करणाऱ्या आणि सामाजिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या”
असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.



महत्त्वाची नोंद:
हे कागदपत्र आरोपांचे वर्णन करते, दोष सिद्ध करत नाही.
अटक किंवा ताबा ही प्रक्रिया तक्रारीच्या आधारे सुरू झाली असून, अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतच ठरतो.
कॉँग्रेस ने केला तीव्र निषेध
सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. संग्राम पाटील यांना आज लंडन हून मुंबई विमानळावर येताच अटक करण्यात आली.
या दडपशाहीचा कॉंग्रेस पक्ष निषेध करतो, त्यांना अटक का केली गेली, हे सरकारने तातडीने जाहीर करावे. संविधान च इथे सर्वतोपरी असेल, इथे हुकूमशाही चालणार नाही.
लेटेस्ट अपडेट
डॉ संग्राम पाटील यांना पहाटे 2 वाजतापासून अटकाव करून ठेवल्यावर आत्ता 15 तासांनंतर सोडण्यात आले आहे
आणि ते एरंडोल या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे रवाना झालं आहेत.
केवळ युके ( United Kingdom) चे नागरिकत्व असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत.
सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पोलिसांनी जो त्रास दिला व छळ केला त्याचा निषेध.
भारतातून जातांना पोलिसांना भेटून जावे असे बंधन त्यांच्यावर घालण्यात आलेले आहे.
माझे संग्राम पाटील यांच्याशी बोलणे झाले आणि ते सुरक्षित आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 10,2025 | 16:55 M
WebTitle – London-based Activist Dr.Sangram Patil Detained at Mumbai Airport, Allegations of Police Harassment























































