नवी मुंबई, दि.24 : नवी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता चिघळला असून आज स्थानिकांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत सिडकोच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक जमले आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या मार्गांची बुधवारपासूनच नाकाबंदी केली होती.
यावेळी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती मिळत असून
या परिसरात कोणत्याही प्रकारच्या खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी एक वर्षाचा तुरुंगवास देखील भोगला.
पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ते 1962, 1967, 1972 आणि 1980 वेळी आमदार म्हणून निवडून गेले.
साडेबारा टक्क्यांची जागा मिळवून देणारे दि बा पाटील कोण आहेत?
1970 च्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा वाढत जाणारा भार कमी व्हावा, यासाठी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे नवं शहर वसवण्याच्या दृष्टीनं तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. यासाठी 17 मार्च 1970 रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सिडको) ची स्थापना केली.
सिडकोच्या माध्यमातून पनवेल, उरण आणि बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50 हजार एकर जमीन संपादनाचा निर्णय घेण्यात आला.दि. बा. पाटील या काळात पनवेल-उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचं सभागृह दाणाणून सोडणारे नेते, अशी त्यांची ख्याती होती.सिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव दिबांना झाली आणि त्यांनी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या, त्यांच्यासाठी आंदोलनाची हाक दिली.
मात्र शेतकऱ्याना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात केवळ 15 हजार एकर या भावाने जमीन संपादन केले जात होते.
त्यावेळी दि बा पाटील यांनी एकरी 40 हजार भाव देण्याची मागणी केली.वसंतदादा पाटील हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
त्यांनीही एकरामागे 40 हजार रुपये देण्याऐवजी 21 हजार रुपये देण्याचे मान्य केलं.
त्यानंतर 27 हजारापर्यंत आले.
सरकारच्या या मनमानीविरोधात उरण, पनवेल परिसरातील 50 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले.जमीन संपादन करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार, गोळीबारात नामदेव घरत (चिर्ले), रघुनाथ ठाकूर (धुतुम), मकळाकर तांडेल (पागोटे), महादेव पाटील (पाहोटे) आणि केशव पाटील या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
आंदोलन चिघळले त्यामुळे या संघर्षानंतर राज्य सरकारनं नमतं घेतलं आणि दिबांशी चर्चा केली. यावेळी दिबांनी मांडलेली योजना पुढे केवळ रायगडकरांच्या नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली. ती योजना म्हणजे, साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला.
जासईच्या या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय ऑक्टोबर 1994 मध्ये झाला. म्हणजे, एखाद्या शेतकऱ्याची जमीन भूसंपादनात गेल्यास, त्या जमिनीला एकरी भाव आणि त्याचसोबत साडेबारा टक्के विकसित भूखंड आणि तोही त्याच भागात देणं बंधनकारक झालं.आज या भूखंडा मुळे नवी मुंबईतील शेतकरी इमारतींचे मालक होत आहेत.
मंडल आयोगाच्या वेळी मोठं काम
दि. बा. पाटलांचे पुत्र अतुल पाटील म्हणतात, “दिबांनी इतर मागासवर्गीयांसाठी केलेलं काम अनेकजण विसरून गेलेत. पण ते विसरता कामा नये. ओबीसी समाजासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. राज्यात दंगली होऊ नयेत म्हणून ते ठिकठिकाणी फिरले.” देशभरात जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या, तेव्हा काही भागात हिंसाही घडली होती. त्यावेळी हिंसेचं हे लोण महाराष्ट्रात येऊ नये म्हणून, दि. बा. पाटलांनी ‘राखीव जागा समर्थन समिती’ स्थापन करून, त्याद्वारे राज्यभर सभा घेतल्या होत्या.
दि बा पाटील यांच्या कुटुंबांची प्रतिक्रिया
“बाळासाहेब ठाकरे किंवा दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं हा संघर्ष आत्ता सुरु झाला आहे.दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केलं ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं असं वाटत असून आमचीदेखील तीच इच्छा आणि आग्रह आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली आहे.
दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे या मागणीला वंचित बहुजन आघाडीने जाहीर समर्थन दिले.
तसेच मनसे नेते राजू पाटील यांनीही समर्थन दिले आहे.
“ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असातना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना जर फिकीर नसेल तर आम्हालाही नाही. आमच्या मागणीसह आम्ही रस्त्यावर आलो आहोत,” असं राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
यासोबतच भारत मुक्ती मोर्चा , राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ , छत्रपती क्रांती सेना यांनी समर्थन दिले आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 24 , 2021 16 : 40 PM
WebTitle – Dispute over naming of Navi Mumbai International Airport; The agitation of the locals 2021-06-24