दिग्दर्शक पा रंजित यांना नुकताच OTT Play Awards ओटीटी प्ले पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात आले. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यास OTT Play Awards filmmaker of the decade दशकालीन पुरस्काराने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी बनवलेल्या काही चित्रपटांमध्ये मद्रास, कबली, काला आणि सारपट्टा परमबराई यांचा समावेश आहे.हेही लक्षात घेण्यासारखं आहे की सिनेजगतात अनेक अवॉर्ड शो आयोजित केले जातात. पण दुसरीकडे, OTT प्लॅटफॉर्मसाठी असे काही खास शो अद्याप आयोजित केले गेलेले नाहीत.मात्र आता त्याच्या सुरुवात झाली आहे.या सोहळ्यात OTT कलाकारांसह इतर अनेक पुरस्कार देण्यात आले. OTT Play Awards शो गौहर खान आणि मनीष पॉल यांनी होस्ट केला होता.
दिग्दर्शक पा रंजित यांना ओटीटी प्ले पुरस्कार सन्मान देण्यासाठी एचटी मीडिया लॅबचे सह-संस्थापक
आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश मुदलियार यांना आमंत्रित करण्यात आले होते,त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी पुरस्कार स्वीकारतान दिग्दर्शक पा. रणजित भावूक झाले होते.त्यांनी यावेळी प्रेक्षकांसमोर एक लहान पण गोड भाषण दिलं,
यावेळी प्रेक्षक त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करत होते.
दिग्दर्शक पा रंजित यांचं ओटीटी प्ले पुरस्कार सोहळ्यातील भाषण
“जय भीम! याबद्दल धन्यवाद (पुरस्काराचा संदर्भ देऊन). मी याची अपेक्षा करत नव्हतो. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद, आर्य सर (सरपट्टा परमबराय मधील त्यांचा मुख्य अभिनेता), निर्मात्यांना आणि प्रत्येकाने माझ्या चित्रपटात भाग घेतलेल्या खूप खूप आभार.मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी आहे.Cultivation of the mind should be the ultimate aim of human existence. मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे.असं ते म्हणाले होते.आणि माझ्या कलेतून मी ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो,धन्यवाद ! “
दिग्दर्शक पा.रंजीत आपला मुद्दा मांडताना कधी आढेवेढे घेत नाहीत.जे म्हणायचं असतं ते थेट भिडणारं.विचारधारा मांडताना सुद्धा ते कधी समझोता करत नाहीत.कबाली आणि काला मध्ये ते ठळकपणे मांडलेलं,जाणवतं.सारपट्टा परंबराइ (Sarpatta Parambarai) ही बॉक्सिंग मॅचवर आधारित स्पोर्ट फिल्म आहे.त्यानंतर आता गाजत असलेली Natchathiram Nagargirathu हि एक राजकीय भाष्य करणारी रोमँटिक ड्रामा फिल्म असल्याचे म्हटले जात असून ती सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.
शनिवारी (१० सप्टेंबर) झालेल्या या कार्यक्रमाने ओटीटी स्पेस, सेलिब्रिटी, कंटेंट निर्माते, जाहिरातदार आणि तंत्रज्ञान सक्षम करणार्यांना ओटीटीच्या भविष्याबद्दल जाणीवपूर्वक विचार करत नव्या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात केली,मनोरंजन व्यवसायाला बदलत्या जगासोबत पुन्हा बदलू शकेल या पार्श्वभूमीवर अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओटीटी प्ले अवॉर्ड्स- हा भारताचा पहिला पॅन-इंडिया ओटीटी पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला आहे.
ओटीटी प्ले अवॉर्ड्स २०२२ मध्ये विद्या बालन , सारा अली खान आणि कार्तिक आर्यन
ते पा रंजित आणि आर्या अशा देशभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
पा रंजित च्या धम्मम च्या निमित्ताने : इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 12,2022, 16:02 PM
WebTitle – Director Pa Ranjith felicitated with OTT Play Awards