नागपूर, दि 17 : कोरोनामुळं काही दिवसांपूर्वी मरण पावलेले नागपूर येथील संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं याची वस्तुस्थिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.संघ स्वयंसेवक दाभाडकर यांच्या मृत्यूला त्यागाचं स्वरूप देणाऱ्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध जोडणाऱ्या भाजपवर काँग्रेसनं या निमित्तानं जोरदार हल्ला चढवला आहे.
संघ स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर हे एप्रिल महिन्यात महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल झाले होते.त्यांची ऑक्सिजन पातळी ५५ पर्यंत खाली आली होती.
असं असतानाही मोठ्या प्रयत्नांनी मिळालेला बेड त्यांनी एका तरुण रुग्णासाठी सोडला.कालांतरानं त्यांचा मृत्यू झाला,अशी माहिती त्यावेळी व्हायरल झाली होती.
दाभाडकर हे संघ स्वयंसेवक असल्यानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या त्यागाचं कौतुक केलं होतं.
सोशल मीडियात तेव्हा देखील भाजप व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली होती.आता माहिती अधिकारातून वेगळीच माहिती समोर आली आहे.
सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.संघ स्वयंसेवक दाभाडकर यांच्या नातलगांनी लिहिलेलं पत्रच सावंत यांनी ट्वीटसोबत शेअर केलं आहे.
स्व नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूचा उपयोग संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी करण्याचा अश्लाघ्य प्रकार भाजपाने केला.
यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान व अनेक भाजपा संघाचे नेते सहभागी झाले. वस्तुस्थिती माहिती अधिकारात समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती”
असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.व पेशंटची स्थिती गंभीर असल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता.
दाभाडकर यांनी स्वतः व त्यांच्या जावयाने Forcefully DAMA ( Discharge against Medical Advice) अंतर्गत स्वतः च्या जबाबदारी वर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली.या पत्रात कोणत्याही तरुणाचा उल्लेख नाही.
या माहिती नंतरही स्व नारायण दाभाडकर यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर कमी होणार नाही. त्यांना राजकारणात ओढणे हे अयोग्य आहे.
त्यांनी जरी असे पाऊल उचलले असते तरी त्याचा संघाशी संबंध जोडणे हे उचित नव्हते.स्व नारायण दाभाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली”असंही सचिन सावंत यांनी शेवटी म्हटलं आहे.
एकूणच याप्रकारामुळे समाज माध्यमातून मिळणाऱ्या बातम्या आणि माहिती आणि सत्यतेविषयी पुन्हा एकदा चिंता वाढल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा.. मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाईचं भाजपा व संघाचे नागपूर कनेक्शन
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 17, 2021 18 : 00 PM
WebTitle – Did RSS volunteer Narayan dabhadkar leave a bed for a corona patient? 2021-06-17