गुजरात मध्ये 700 किलो आणि दिल्ली मध्ये 900 कोटींचे ड्रग्स पकडले; 8 ईराणी नागरिक अटक : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 15 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये 82.53 किलो कोकेन जप्त केले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 900 कोटी रुपये आहे. या मोठ्या ऑपरेशनमध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. कोकेनची ही खेप नांगलोई आणि जनकपुरी या भागातील एका कुरिअर ऑफिसमधून जप्त करण्यात आली. ती खेप ऑस्ट्रेलियाला पाठवली जाणार होती.
याच दिवशी एनसीबी, भारतीय नौसेना आणि गुजरात ATS ने संयुक्तपणे गुजरात किनाऱ्याजवळ 700 किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्स जप्त केले. या कारवाईत आठ ईराणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एका दिवसात करण्यात आलेल्या या दोन मोठ्या कारवाया सरकारच्या “नशामुक्त भारत” मोहिमेसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या शुभेच्छा
गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटद्वारे या मोठ्या यशासाठी एनसीबीचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, “एका दिवसात नशेखोरीच्या अवैध धंद्याविरोधात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मोदी सरकारची ‘नशामुक्त भारत’ बनवण्याची ठाम बांधिलकी दिसून येते. आमची कारवाई ‘खालपासून वर’ या दृष्टिकोनावर आधारित आहे, आणि हे अभियान सुरूच राहील.”
आंतरराष्ट्रीय नेटवर्कचे ड्रग्स सिंडिकेट
एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ड्रग्स सिंडिकेटचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली आणि सोनीपत येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की जप्त करण्यात आलेल्या कोकेनची क्वालिटी खूप उच्च स्तरावर आहे आणि त्याला परदेशी बाजारात खूप मागणी आहे.
दिल्लीतील पूर्वीच्या मोठ्या ड्रग्स जप्ती
दिल्लीमध्ये ही पहिलीच वेळ नाही, जिथे इतकी मोठी ड्रग्स खेप पकडली गेली आहे.
2 ऑक्टोबर रोजी दक्षिण दिल्लीच्या महिपालपूर येथील एका गोडाऊनमधून
560 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक मारिजुआना जप्त करण्यात आले होते.
या खेपाची किंमत सुमारे 5,620 कोटी रुपये होती, जी दिल्लीतील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्स केस ठरली आहे.
अमली पदार्थांची मोठी खेप पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
दिल्लीत अमली पदार्थांची मोठी खेप पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही.यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील महिपालपूर येथील एका गोदामातून 560 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला होता.ज्याची अंदाजे किंमत 5,620 कोटी रुपये आहे. या प्रकरणातील कथित सूत्रधार तुषार गोयल याला अटक करण्यात आली होती.
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच गुजरात एटीएस आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 3300 किलो ड्रग्ज जप्त केले होते. नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या माहिती नुसार या कारवाईत 3089 किलो चरस, 158 किलो मेथॅम्फेटामाइन आणि 25 किलो मॉर्फिन जप्त करण्यात आले.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16,2024 | 09:26 AM
WebTitle – delhi-gujarat-drugs-seizure-900-crore-8-irani-arrested