मुंबई, दि. 5 : विधानमंडळाच्या सदस्यांसाठी उद्या विधानभवनात सकाळी 11.30 ते दुपारी 1 या काळात ‘समर्पण ध्यानयोग शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
शिवकृपानंद स्वामी यांच्या सहकार्याने या ध्यानयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली.
दरम्यान,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळातच ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळावा, असा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला.
सत्ताधारी व विरोधकांनी यावेळी एकमेकांवर जोरदार आरोप केले. (Empirical Data for OBC Reservation)
पावसाळी अधिवेशन : प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी 2021 काय बदलणार जाणून घ्या
2021 पावसाळी अधिवेशनात नविन प्रस्तावित विधेयक व अध्यादेशांची यादी खालीप्रमाणे असणार आहे. जाणून घ्या काय काय बदलणार आहे? आणि काय काय नव्याने अंतर्भूत होणार आहे?
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या नसल्यामुळे बरेच सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)
संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके– महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतुदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलामांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 हिवाळी अधिवेशन 2020 मध्ये आणण्यात आला. (गृह विभाग)
विधानसभेत प्रलंबित विधेयक – शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूद्धच्या गुन्ह्यांसाठी महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक, 2020 आणण्यात आले. याअंतर्गत महिलांच्या व बालकांच्या विरूद्धच्या गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधारण न्यायालये निर्माण करून 30 कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. (गृह विभाग).
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 05 , 2021 15 : 30 PM
WebTitle – ‘Dedication Meditation Camp’ at Vidhan Bhavan tomorrow 2021-07-05