बॉलीवूड अभिनेता सलमान खान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात मुंबईच्या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला 5 नोव्हेंबरला ही धमकी देण्यात आली होती.मात्र आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे.
शाहरुख खान ला जीवे मारण्याची धमकी देणारा भलताच?
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, कॉलरची ओळख फैजान खान म्हणून झाली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला रायपूर, छत्तीसगड येथे शोधले आहे.
पोलिस त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी रायपूर रवाना झाले आहेत.
रिपोर्टनुसार, सेक्शन 308(4), 351(3)(4) अंतर्गत फैजानच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, फैजानने 50 लाख रुपयांची मागणी केली असा आरोप आहे.
शाहरुख खान ला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर तपासाला लागलेल्या मुंबई पोलिसांनी त्वरित त्या नंबरचा कॉल ट्रेस केला, ज्या नंबरवरून शाहरुखला फोन आला होता. तपासात समोर आलं की हा कॉल रायपूरमधून आला आहे. पोलिसांनी रायपूरमध्ये पोहोचून तपास सुरू केला. रायपूरमध्ये त्यांनी शाहरुखला धमकी दिलेल्या फैजान खानच्या फोनची चौकशी केली. फैजानने सांगितलं की त्याचा फोन पाच दिवसांपूर्वीच चोरीला गेला होता.
शाहरुख खान च्या नावे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे दीड वाजता वांद्रे पोलिसांना एक धमकी देणारा कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, “शाहरुख खान मन्नत बँड स्टँडवर आहे… त्याने मला ५० लाख रुपये दिले नाही, तर त्याला जीवे मारू.” पोलिसांनी त्याच्याकडे नाव विचारले असता, तो म्हणाला, “माझं नाव महत्त्वाचं नाही; लिहायचं असेल, तर ‘हिंदुस्तानी’ लिहा.”
जुनी दुश्मनी संपवण्यासाठी पाच कोटी रुपये मागण्यात आले
गेल्या काही दिवसांत सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्यांचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांना एक संदेश मिळाला होता, ज्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंगसोबतची जुनी दुश्मनी संपवण्यासाठी पाच कोटी रुपये मागण्यात आले होते. स्वतःला बिश्नोई गॅंगचा सदस्य म्हणवणाऱ्याने संदेशात धमकी दिली होती की, जर त्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले गेले तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल.तपासात त्याचा गँग शी संबंध नसल्याचे समोर आले होते.
गेल्या काही काळात सलमान खानला जीवे मारण्याच्या अनेक कटांचा खुलासा झाला आहे. त्यांच्या बांद्रास्थित घरावर गोळ्या झाडण्यात आल्या. सलमानला मारण्याच्या उद्देशाने आलेले शुटर्स पोलिसांच्या ताब्यात आले. सर्व प्रकरणांत गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे. 17 ऑक्टोबरला मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांसोबत संयुक्त ऑपरेशन करून बिश्नोई गॅंगचा शूटर सुक्खाला अटक केली होती.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08,2024 | 13:45 PM
WebTitle – Death threat to Shah Rukh Khan Big twist