धर्मधिष्ठित समाजात स्त्री शूद्र मानली गेली परंतु दलित स्त्रीला तर अस्तित्वच नाही? कल्याणच्या सुभेदाराबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या सहा सोनेरी पाने मधे मांडलेले मत काल मी दिले होते. सावरकरांनी असे म्हटले की नाही, म्हटले असल्यास त्याचा नेमका संदर्भ काय हा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही. ज्यांना असे प्रश्न पडतात त्यांनी आपल्या दैवताचे पूर्ण लिखाण वाचून मगच प्रतिवाद करावा.
भगव्या लिबरल्स फेमिनिस्ट्स
मुद्दा सध्या भगव्या लिबरल स्त्रीवाद्यांचा आहे. जेव्हां खैरलांजीचा विषय येतो तेव्हां पुरोगामी लेफ्टीस्ट लिबरल्स आणि फेमिनिस्ट्स जो मुद्दा मांडतात तोच भगव्या लिबरल्स देखील मांडत असतात. दोन्ही पार्ट्यांचे एकमत असते पण आपल्यावर आरोप होतात तेव्हां. यांचं म्हणणं असतं की बलात्कार हा बलात्कार असतो. त्यात जात का आणता ?
जेव्हां या खेम्यातले पुरूष प्रतिवाद करू शकत नाहीत तेव्हां त्या खेम्याच्या स्त्रीवाद्या पुढे सरसावतात. आता फेमिनिस्ट्स या स्वतंत्र नसून कुठल्या ना कुठल्या खेम्याशी बांधलेल्या आहेत हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे त्य़ांच्या प्रतिवादात हेत्वारोप नसतात असे म्हणताच येत नाही. सध्या भगव्या लिबरल्स फेमिनिस्ट्स हा मुद्दा मांडत असल्याने त्य़ांना सावरकरांच्या या विचारांची आठवण करून देणे गरजेचे आहे.
शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार (स्त्री शूद्र)
शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार हा युद्धाचा महत्वाचा भाग आहे असे सावरकर म्हणतात.
मग यात तिच्यावर स्त्री म्हणून बलात्कार झाला की ती शत्रूची स्त्री आहे म्हणून बलात्कार झाला ?
सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचले तर शत्रू म्हणजे यवन आणि बौद्ध हे स्पष्ट होईल.यवन म्हणजे सावरकरांना मुस्लीम अपेक्षित आहेत.
गुजरात २००२ मधे जे झाले ते कुणी केलं हे सर्वांना माहीत आहे.
या मंडळींचे दैवत कोण हे ही ठाऊक आहे.तर मग गुजरात दंगलींदरम्यान झालेले बलात्कार हे वासनेपोटी झाले का ?
शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार केल्याने त्याचे मानसिक खच्चीकरण होते असा सिद्धांत सावरकर जुन्या धर्मग्रंथांच्या आधारे मांडतात.
त्याला जगातल्या अनेक युद्धपिपासू नायकांची उदाहरणे देऊन समर्थनही करू पाहतात.
या स्त्रियांची बहुजन स्त्रियांनी खेटराने पूजा का घालू नये ?
खैरलांजीच्या घटनेत बायका आपल्या नव-यांना मायलेकीवर बलात्कार करा असे सांगत होत्या. टाळ्या वाजवत होत्या.हा बलात्कार वासनेपोटी झाला का ? वासनांध मनुष्य आडोसा पाहून आपली भूक भागवेल की सामूहीक बलात्कारासाठी जमाव जमवून हमला करेल ? आणि त्यात दोन मुलांचीही क्रूरपणे हत्या झाली. यात स्त्री म्हणून बलात्कार झाला , त्यात जात का शोधता असा भंपक युक्तीवाद करून आपल्या खेम्यातल्या पुरूषांची सुटका करण्यासाठी हिरीरीने आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेऊन अपमानास्पद आणि असंवेदनशील पद्धतीने चर्चा करणा-या या स्त्रियांची बहुजन स्त्रियांनी खेटराने पूजा का घालू नये ?
खैरलांजी मधे या स्त्रिया का आल्या नाहीत याला यांच्याकडे उत्तर नाही.
त्य़ा निर्भया च्या वेळी काय युक्तीवाद करतात आणि खैरलांजी,
हाथरस मधे काय युक्तीवाद करतात यावरून त्यांचा बौद्धीक व्यभिचार समोर येतो. हा ही बलात्कारच.
तुमच्य़ा प्रायोरिटीज काय ?
बलात्कार इतरही घटनात होतात. ते प्रत्येक वेळी वासनेतून झालेले नसतात हे मान्यच करणार नाही का ?
जाती, धर्माला शत्रू समजून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार करणा-याचा योनीशुचितेच्या बाबतीत क्लास घ्यायचा की बलात्कार आणि खूनाच्या प्रकरणात ते प्रकरण उजेडात आणून पुरावे नष्ट होऊ नये म्हणून आक्रोश करणा-यांचा क्लास घ्यायचा ?
तुमच्य़ा प्रायोरिटीज काय ?
एकंदरीत अवघड आहे. सगळेच भंपक आहेत असे मत होत चालले आहे.
चुकीचे असेल तर कळवावे.
by Kiran Chavan
लेखक सामाजिक चळवळींचे अभ्यासक विश्लेषक आहेत.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)