मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर (Corona Outbreak) होत असल्याचं चित्र आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता नवी नियमावली (Corona Guidelines) जाहीर केली आहे. राज्य सरकारची नवी नियमावली नुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.मात्र सर्व सामान्यांना दिलासा म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी सध्यातरी कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
दरम्यान,आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
नागरिकांसाठी नियमावली खालील प्रमाणे
राज्यात सकाळी जमावबंदी, तर रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू
सरकारी नोकरदारांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली
लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन नागरिकांशी संवाद राखणे
एकाच कॅम्पसमधील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देणं,
तसंच कार्यालयाच्या सोयीनुसार त्यांच्या कामाच्या तासात बदल करणे
सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचे तंतोतंत पालन व्हावे
थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे
खासगी कार्यालये
खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश,
लस घेतले नसलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे
कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याची काळजी घ्यावी
थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे.
– लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती
– अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांची उपस्थिती
– सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती
– शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. मात्र 10 वी, 12वीचे वर्ग सुरु राहणार. तसंच शाळेतील प्रशासकीय कामे सुरु राहणार.
– स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून बंद राहणार
– हेअर कटिंग सलून 50 टक्के उपस्थितीत सुरु राहणार, सलूनमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि कामगारांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक, रात्री 10 पर्यंतच परवानगी
– मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद राहणार
– शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
– चित्रपटगृहे, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
– तारीख जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार
Bulli Bai App : नेपाळी तरुण म्हणाला, हिंमत असेल तर अटक करा
‘बुल्ली बाई’ अॅप :पोलिसांनी बेंगळुरूच्या व्यक्तीला घेतले ताब्यात
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08, 2022 21 : 56 PM
WebTitle – corona update new regulations issued in the maharashtra