चीनचे अनियंत्रीत रॉकेट (Chinese Rocket) “Long March 5 B” हे अखेर मालदीव बेटांच्या पूर्वेस हिंद महासागरात कोसळले.रविवारी सकाळी 07 वाजून 54 मिनिटांनी हे रॉकेट कोसळले अशी माहिती “चायना नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन” ने दिली आहे.यामुळे संपूर्ण जगाने मात्र सुटकेचा निश्वास घेतला आहे.
कोविड काळात चायना कडून उद्भवलेली ही आपत्ती संपूर्ण जगासाठी चिंताजनक बाब ठरली होती.
चीनच्या अवकाश मोहिमेचा भाग असलेले “Long March 5 B” chinese rocket हे अवकाशात सोडल्यानंतर
काही वेळातच त्याचा पृथ्वीवरील संपर्क तुटला.रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याने,
ते जगाच्या कोणत्याही भागात कोसळण्याची शक्यता होती.
18 हजार मैल प्रतीतास अशा प्रचंड वेगाने ते पृथ्वीच्या दिशेने झेपावत होते.
या रॉकेट चे वजन 21 टन असल्याने हे ज्या भागावर कोसळेल तिथे मोठा विध्वंस होईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
100 फुट लांब आणि 16 फुट रुंद असणारे हे रॉकेट दक्षिण अमेरिका,मेक्सिको,मध्य अमेरिका ,पेरू,कॅरेबियन बेट,इक्वाडोर कोलंबिया,व्हेनिन्झूएला,दक्षिण युरोप,दक्षिण मध्य आफ्रिका ,दक्षिण भारत,ऑस्ट्रेलिया,न्यूयॉर्क,माद्रीद,दक्षिण चिली,वेलिंग्टन,न्यूझीलँड इत्यादी भागात कोसळू शकते असा कयास अवकाश तज्ज्ञांनी लावला होता.
अखेर रविवारी सकाळी हे रॉकेट भारताच्या दक्षिण पश्चिम दिशेला असलेल्या मालदीव बेटांच्या पूर्वेला हिंद महासागरात कोसळले.
पृथ्वीच्या कक्षेत येताच या रॉकेटचा मोठा भाग जळून राख झाला.
आणि इतर उरलेला भाग हिंद महासागरात कोसळला. सकारात्मक बाब ही की यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान,चीनकडून अवकाशात सोडण्यात आलेल्या अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत.
गेल्या वर्षीही मे मध्येच चीनचे असेच एक रॉकेट पृथ्वीवर कोसळले होते.
मात्र ते अटलांटिक महासागरात कोसळल्याने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
पीनराई विजयन यांनी राखला केरळ शाबूत
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 09, 2021 12: 52 PM
WebTitle – Chinese Rocket – China’s uncontrolled rocket finally crashed into the sea 2021-05-09