वेदोक्त प्रकरण
वेदोक्त प्रकरण (vedokt prakaran) हिंदू समाज रचनेत व्यवसायिक वर्ग आणि जाती यांच्या दोन विभागात विभागणी झाली आहे त्या म्हणजे आर्य आणि अनार्य. आर्य म्हणजे ज्यांना शास्त्रात वेद पठणाचा अधिकार आहे ज्यांचे धार्मिक संस्कार व धार्मिक विधी वेदोक्त मंत्राने पार पाडले जातात आणि धार्मिक विधी व संस्कार करण्याचा अधिकार आहे म्हणजे आर्य.
आर्यांमध्ये पुन्हा तीन वर्ग होतात ते प्रतिष्ठेच्या क्रमाने ब्राम्हण क्षत्रिय व वैश्य.हे तिनही वर्ग वेदोक्त कर्मासाठी पात्र आहेत असे अनादीकालापासून समजले जाते. शुद्र वर्णियांना वेद पठणाचा अथवा वेदोक्त मंत्रांनी संस्कार करण्याचे अधिकार नाहीत म्हणजेच ते अनार्य अथवा आर्येतर आहेत.
शाहु महाराजांबाबतचे वेदोक्त प्रकरण काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याआधी घडलेल्या वेदोक्त प्रकरणाची माहिती घ्यावी लागते. महाराष्ट्रातील पहिले वेदोक्त प्रकरण हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला घडले होते.
त्यावेळी विश्वेश्वर भट्ट उर्फ गागाभट्ट या काशीच्या धर्मशास्त्रज्ञ महाराष्ट्रीय पंडिताने शिवाजी महाराज व त्यांचे भोसले कुळ हे राजस्थानातील सिसोदिया या क्षत्रिय घराण्याचे आहे असे सांगत त्यांना वेदोक्त मंत्र आणि राज्याभिषेक संस्कार केला.
त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा वेदोक्त प्रकरणाचा वाद एकोणिसाव्या शतकात सातारच्या गादीचे प्रतापसिंह महाराज त्यांच्या बाबतीत घडला.त्यानंतर बडोद्याचे सयाजीराव महाराज व त्यानंतर शाहू महाराजांचे प्रकरण होय.
शाहू महाराजांनी 1905 मध्ये आपल्या घराण्यातील धार्मिक विधी वेदोक्त प्रकारे व्हावे असे आज्ञापत्र काढले. तसेच संकेश्वर करवीर मठांच्या शंकराचार्य करून त्याबाबतीतले आज्ञापत्र ही मिळवले.
मात्र या प्रकरणाच्या निमित्ताने करवीर व संकेश्वर पिठाच्या दोन परस्पर विरोधी शिष्य परंपरा निर्माण झाल्या त्यामध्ये वाईचा शिष्य वृंद हा महाराजांच्या विरुद्ध उभा होता,तर महाराजांच्या आश्रयाखाली असलेले शंकराचार्य हे महाराजांच्या वेदोक्त आधिकाराचे समर्थन करीत होते.
या सगळ्यामुळे शाहू महाराज यांची दृष्टी जन्मसिद्ध जातीभेदाच्या पलीकडे पोचली होती .महाराजांच्या मते सर्व माणसांना वेदपठण याचा अधिकार आहे असे ते पुरस्कार करू लागले.
वंशपरंपरागत जातीभेदावर आधारित असलेली वर्णव्यवस्था मानवी हिताची नाही ,जातिभेद आधारित वर्णव्यवस्था जरा रूप धारण करते त्यामुळे समाजाची अवनती होत आहे या भूमिकेशी महाराज पोहोचले होते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात की ,”छत्रपती शाहू महाराजांच्या वेळी महाराष्ट्रातील ब्राह्मण शास्त्री-पंडितांनी जो वेदोक्ताचा वाद माजवला तो खरोखरच अज्ञान मूलक होता.शास्त्री पंडितांचा कमलाकर भटाचा शूद्र धर्मतत्त्व हा ग्रंथ आधार होता तर कमलाकर भटाचा पुतण्या गागाभट्ट यानेच महाराष्ट्रातील मराठ्यांना वेदोक्ताचा अधिकार आहे हे मान्य केले होते.
हा नुकताच घडलेला इतिहास शास्त्री-पंडितांनी लक्षात घेतला नाही त्याची दोन कारणे आहेत.
पहिले कारण म्हणजे महाराष्ट्रातील मराठ्यांचा वेदोक्त कर्माचा अधिकार मान्य केल्यास त्यांची आणि ब्राह्मणांची प्रतिष्ठेची श्रेणी यामध्ये अंतर राहत नाही.
प्रतिष्ठेचा ब्राह्मणी अहंकार हे याचे कारण आहे.
दुसरे कारण म्हणजे परंपरागत रूढी ला तत्व समजून चिकटून बसणे.
या अंधश्रद्धेपायी आपण प्राचीन भारतातील समाज संस्थेचे आधारभूत
किंवा मूलभूत तत्व नाकारतो हे त्यांच्या लक्षात आले नाही.”
आता वेदोक्त प्रकरण म्हणजे काय ते पाहू
सन 1894 ते 1922 या 28 वर्षांच्या कारकिर्दीत सन 1900 ते 1905 या पाच वर्षाच्या काळात हे वेदोक्त प्रकरण झाले.
शाहू महाराजांचे कुलपुरोहित श्री नारायणराव राजोपाध्ये व शाहू महाराज यांच्यात हे प्रकरण होते.
“राजकारणात केल्या जाणाऱ्या दैनंदिन व नैमित्तिक स्वरूपाच्या सर्व धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधी नुसारच करण्यात याव्यात”असा आदेश शाहू महाराज यांनी काढला होता.
त्या आदेशाला नारायणराव राजोपाध्ये यांनी फेटाळले.
त्यामुळे शाहू महाराजांनी नारायणराव राजोपाध्ये यांना कुलपुरोहित या पदावरून काढून टाकले तसेच त्यांना वतन म्हणून देण्यात आलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात आल्या.आणि संस्थान च्या सरदरांच्या यादीतून त्यांचे नाव कमी केले.
शाहू महाराजांच्या शासकीय कृती विरुद्ध नारायण राजोपाध्ये यांनी लढा देण्याचे ठरवले.तसे पाहायला गेले तर हा विषय नारायण राजोपाध्ये व शाहू महाराज यांच्यातील होता.
पण करवीर संस्थांमधील ब्राह्मण व महाराष्ट्रातील ब्राह्मण यांनी नारायणराव राजू पाध्ये यांना सक्रीय पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने तसेच शाहू महाराजांच्या विरुद्ध आघाडी उघडल्याने हा प्रश्न केवळ शाहू महाराज व नारायण राजू पाध्ये यांच्यात न राहता तो सार्वजनिक झाला.
याप्रकरणी संस्थानातील शासकीय कर्मचारी व अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,धार्मिक नेते, विद्वत्त वर्ग,वकील, प्राध्यापक, समस्त ब्राह्मण समाज, वर्तमानपत्राचे संपादक मान्यवर, कायदेपंडित, प्रभावी साहित्यिक हेसुद्धा नारायणराव राजोपाध्ये यांच्या बाजूने सामील झाले.
नारायण राजोपाध्ये यांनी ब्रिटिश सरकारकडे इनाम जमिनी वैध ठरवण्याची मागणी केली.
ब्रिटिश हस्तक्षेपाची मागणी केली, करवीर संस्थानच्या जाहीर चौकशीची मागणी केली त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला.
ब्रिटिश सरकारने मात्र यामध्ये नारायणराव राजोपाध्ये यांना कोणत्याही प्रकारचे अभय दिले नाही.
त्यांच्या या तिन्ही मागण्या मान्य केल्या नाहीत. हे प्रकरण सुरू असताना ब्राह्मणांनी वेदोक्ताची बाजू घेणारे पुरोहित व सामान्य ब्राह्मण यांना धार्मिक स्वरूपाची शिक्षा देण्यास सुरुवात केली,श्री नारायण भट सेवेकरी यांनी वेदोक्त विधीनुसार राजघराण्यातील धार्मिक कामे करण्यास प्रारंभ केल्याने त्यांना ब्रह्मवृंदाने धर्मबहिष्कृत केले.
त्यांच्यासह इतर सामान्य ब्राह्मणांना जे शाहू महाराजांच्या बाजूने होते.
पूजाअर्चा धार्मिक कामे यास प्रतिबंध केला.तसेच महालक्ष्मी मंदिरात पूजेलाही प्रतिबंध केला.
त्याचप्रमाणे विटाळ होऊ नये म्हणून सार्वजनिक नळावर पाणी भरण्यास प्रतिबंध केला,अंत्यसंस्काराला सुद्धा प्रतिबंध केला.
अजून कमाल तर पुढेच आहे ब्राह्मणांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत प्रक्षोभक वर्तन केले.
1902 सालच्या मे महिन्यात शाहू महाराज इंग्लंड ला निघाले असता त्यांना आशीर्वाद देण्यास साफ नकार दिला.
तसेच शाहू महाराज परत आल्यावर त्यांना महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला.
या अगोदर असा निर्णय कित्येक लोकांच्या बाबतीत घेण्यात आला नव्हता.
त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरून शाहू महाराज सुखरूप परत आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ
आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी सत्कार समारंभाच्या वेळेला विघ्न आणण्याचे अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
तसेच शाहू महाराज यांच्या दत्तक मातोश्री आनंदीबाई महाराज यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक हरकती घेण्यात आल्या.
दैवी प्रकोपाची भीती घालण्यात आली राजघराण्यात भयनिर्मिती करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.
शाहू महाराजांच्या क्षत्रियतत्वालर आक्षेप घेण्यात आले.
इनाम जमिनी बळकावण्याचा आरोपही करण्यात आला.
तसेच बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या सांगण्यावरून हा वेदोक्ताचा वाद सुरू केला असा आरोप केला गेला.
वर्तमानपत्रातून ही शाहू महाराजांच्या विरुद्ध जहरी प्रचार सुरू केला गेला.
त्यामध्ये मोदवृत्त( पुणे )काळ( पुणे) गुराखी( पुणे (जगध्दितेच्छु (पुणे)
प्रेक्षक (सातारा) सुबोधसिंधू (खांडवा) बेळगाव समाचार (बेळगाव)
ब्रह्मोदय (कोल्हापूर (धर्म (वाई) अशा अनेक वर्तमान पत्रातून लेख लिहिले गेले.
तसेच काही खास पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
त्यात सोबत नारायण राजोपाध्ये यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले गेले.
पण शेवटी वेदोक्त प्रकरणात लॉर्ड कर्जन यांनी 1905 ला अंतिम निर्णय दिल्यानंतर धर्मपीठ व ब्राह्मण समाजातर्फे निर्णय घेण्यात आले.
दहा जुलै 1905 रोजी करवीर धर्मपीठचा वेदोक्त प्रकरणी निर्णय झाला.
त्यामध्ये करवीर पीठ असे म्हणते की,”छत्रपती शाहू महाराज यांचे घराणे क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नाही”.
तसेच शंकराचार्यांनी शाहू महाराज क्षत्रिय आहेत तसेच त्यांनी वेदोक्त विधीनुसार
धार्मिक कामे करण्यास हरकत नाही यावर कुणीही शंक घेणे नाही अशा प्रकारच आज्ञा केली.
या सगळ्यामुळे शाहू महाराजांच्या विरुद्ध जहरी टीका करत असणारे,राजेपण नाकारणारे,दिशाभूल करणारे, क्षत्रियत्व नाकारणारे सर्व ब्रम्हवृंद तोंडावर आपटले.
यातूनच शाहु महाराजांनी बहुजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे दिसून येते.
लेखन – सतिश भारतवासी
(कोल्हापूर)
लेखक आंबेडकरी चळवळ अभ्यासक आहेत.
हे ही वाचा..आरक्षणाचे जनक धाडसी छत्रपती शाहू महाराज
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 26 , 2021 12: 44 PM
WebTitle – chhatrapati Shahumaharaj Vedokt Prakaran 2020-08-26