वर्णव्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रूजलेल्या आणि भट, ब्राम्हण, पुरोहीत अश्या मनुवादी विचारांचे सामाजिक, राजकीय,आर्थिक,शैक्षणिक या सर्व स्तरांवर वर्चस्व असतांना अस्पृश्यांना आरक्षण देवून त्यांना सामाजिक स्तरावर समान संधी देण्याकरीता आरक्षणाचा विचार करणे,त्याची अबंलबजावणी करणे हेच खुप मोठे धाडस होते.
ब्रिटीश अमंलाखाली असलेल्या भारतात अस्तित्वात असलेल्या राजवटीतील बहुतेक राजे, महाराजे, संस्थानिकांना निर्णयाचे अत्यंत तोकडे अधिकार होते.
प्रजेचे प्रश्न, त्यांच्या समस्या, गरजा यापेक्षा आपल्या स्व:ताच्या सुखसिन जगण्याकरीताच बहुतेक राजांचे प्रयत्न होत असतांना,कोल्हापूर संस्थानातील अवघ्या विसाव्या वर्षी म्हणजे 1894 ला छत्रपती म्हणून राज्यकारभार सांभाळणारे छत्रपती शाहुजी महाराज यांनी 1986 मध्ये सर्व बहुजन-अस्पृश्यांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत तर केलेच,पण शिक्षणाकरीता मुले शाळेत पाठवली नाहीत तर महीन्याला एक रूपया दंड आकारण्यास सूरवात केली.
पाचशे, हजार लोकवस्त्या असलेल्या गावात शाळा सूरू झाल्या. जातीव्यवस्थेची विभागणी पाहून त्यांनी शिक्षणाकरीता मराठा, कुणबी, जैन, ब्राम्हण, चांभार, महार, मुस्लीम, ख्रिश्चन, लिगांयत, वैश्य अश्या अनेक धर्म व जातीं करीता वेगवेगळे वस्तीगृहे बांधुन राहण्या खाण्याची व्यवस्था केली.
सर्व वर्णातील मुलांना सामाजिक समानता मिळावी म्हणून शिक्षणास प्रवृत्त करतांनाच 1902 मध्ये सामाजिक आरक्षणासारखा प्रचंड मोठा निर्णय घेवून त्याची अमंलबजावणी करण्याकरीता आपल्याच संस्थानात विविध पदांवर अस्पृश्य जातीतील तरुणांना नौक-या देणे,त्यांना पंडीत सारख्या पदव्या देणे, त्यांना परंपरात जाती व्यवसायातुन बाहेर काढण्याकरीता दूकान, व्यवसाय थाटण्यास प्रवृत्त करतानांच आर्थिक पाठबळ देणे हे खरच खुप धाडसाचे कार्य होते.
हे ही वाचा.. शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण
1920 ला माणगांव परिषदेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना समोर आणत हेच दुर्बल,वंचित,अस्पृश्यांचे खरे नेते म्हणून लोकांसमोर त्यांना प्रोत्साहित करत त्यांचे मनोबल अधिक उंचवणारे,
लोकांच्या प्रश्नांना,समस्यांना वाचा फोडणारे “मुकनायक” चालावे म्हणून आर्थिक सहाय्य करणारे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहूमहाराज हे रयतेच्या समस्यांना जाणणारे,उच्च वैचारीक क्षमता आणि निर्णायक क्षमता असलेले प्रजापालक राजे होते.
स्त्रीयांना शिक्षणाचा हक्क, विधवा पुनर्विवाह करीता 1917 मध्ये केलेला कायदा, जोगत्या, मुरळी,
देवदासी प्रथा बंद करण्याकरीता केलेले कायदे हे त्यांच्या स्त्रीयांना समाजात मानाचे स्थान देवून स्त्री-पुरूष समानतेला चालना देणारे कार्य आहे.
शेतक-यांना सिचंन प्रकल्प,मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून राधानगरी धरण, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था,
शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती
शेतकर्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे इत्यादी उपक्रम राबविले.
1919 मध्ये बलुतेदारी पद्धत बंद केली.26 जुन 1874 मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात जन्मलेले
जयसिंगराव घाटगे यांचे जेष्ठ पुत्र असलेले यशवंतराव यांना कोल्हापूर संस्थानाचे राजे
चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले होते
व त्यांचे नाव सांगा “शाहू” असे ठेवले.
एकंदरीत 28 वर्ष राज्यकारभार करणारे “चौथे शाहू” राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी वेदोक्त प्रकरणानंतर
आपल्या संपुर्ण राजकीय जीवनात मनुवादी वृत्तीला आळा घालत महामानव जोतीबा फुले यांनी उभारलेल्या सत्यशोधक चळवळीचा प्रचार व प्रसार केला.
भेदाभेद नष्ट करत, मानवतावादी धोरणांचा स्विकार करून सामाजिक समानतेची संकल्पना अधिक दृढ करण्यात मोलाचे कार्य केले.
फुले-शाहू आंबेडकर विचारधारेला आज संपुर्ण जगात एक मानवतावादी विचारधारा म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या कार्याचे हे कौतुकच म्हणावे लागेल.
छत्रपती शाहुजी महाराज यांच्या कार्यास व स्मृतीस त्रिवार अभिवादन.
लेखन – एॅड योगिता रायपुरे, चंद्रपूर
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 26 , 2021 12: 44 PM
WebTitle – Chhatrapati Shahu Maharaj, the father of reservation 2021-06-26