एंशी च्या दशकात आलेला हिंदी चित्रपट “एक दुजे के लीये” मधिल वासू अन सपना यांची जोडी अनेकांना माहितच असेल.एकत्र जगणं आणि एकत्र मरणं हा प्रत्येक प्रियकर-प्रेयसीचा मूळ मंत्र मानला जातो.परंतु काहीवेळेस फसवणुकीच्या धोक्याच्या घटनाही घडत असतात.दुसरीकडे सोबत जीवन संपवणाऱ्या घटनाही घडतात पण असंही होऊ शकते की प्रेयसी आत्महत्येसाठी तयार होते आणि प्रियकर अर्ध्यातूनच माघार घेत पळून जातो. किंवा काही घटनेते आत्महत्या करण्याच्या घटनेत प्रेयसी माघार घेते आणि प्रियकर..असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये घडला आहे.
जगणे आणि मरण्याचे व्रत घेतलेल्या एका जोडप्याने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्लान रचला.
अशा स्थितीत तरुणीने नदीत उडी मारली मात्र तिचा प्रियकर असणाऱ्या तरुणाने लगेचच तेथून पळ काढला.
त्यानंतर प्रेयसीने प्रेयसीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने नदीत उडी मारल्यानंतर प्रियकर फरार
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार,हे संपूर्ण प्रकरण प्रयागराजच्या नैनी ब्रिजचे आहे, जिथे प्रेयसी आणि प्रियकर उडी मारून आत्महत्या करण्यासाठी आले होते. मात्र प्रेयसीने उडी मारल्यानंतर प्रियकर तिथून पळून गेला. चांगली गोष्ट अशी होती की प्रेयसीला पोहता येत होते. तिला नदीतून पोहण्यात यश आले. यानंतर तिने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
सर्व काही सोडून आखला आत्महत्येचा बेत
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीचे लग्न होऊन 30 वर्षे झाली आहेत.तिला एक मूल देखील आहे.
तिचे एका 30 वर्षीय पुरुषावर प्रेम होते.
दोघेही एकमेकांवर इतके प्रेम करत होते की त्यांनी सर्व काही सोडून सोबत आत्महत्या करण्याचा विचार केला.
दोघांमध्ये वाद सुरू झाला
प्रेयसी मुलासह पुण्याला फिरायला गेली तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.
दरम्यान, तिच्या प्रियकराने दुसऱ्या तरुणीशी लग्न केले.
प्रेयसी पुण्याहून परत आल्यावर तिला प्रियकराचे हे लग्न आवडले नाही म्हणून ती रागावली.त्यानंतर दोघांत प्रचंड वाद सुरू झाले.
यानंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. शेवटी या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडने एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.
तशी तयारी करून ते प्रयागराजच्या नैनी ब्रिजवर गेले आणि तिथून दोघांनी उडी घेण्याचा निश्चय केला,त्यानंतर प्रेयसीने उडी घेतली मात्र प्रियकर उडी न घेताच तिथून पळून गेला.चांगली गोष्ट अशी होती की प्रेयसीला पोहता येत होते. तिला नदीतून पोहण्यात यश आले. यानंतर तिने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
10 लाख नोकऱ्या 18 महिन्यात; प्रधानमंत्र्यांचे आदेश “मिशन मोड”
यूट्यूबरला अटक, नूपुर शर्मा चा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 15 2022, 12: 07 PM
WebTitle – Cheating on a woman while committing suicide, boyfriend ran away without jumping, FIR lodged