28 जानेवारी 2025 | दिल्ली, गाझीपूर: गाझीपूर सुटेकस कांड : शिल्पा पांडे तिच्या भावासोबत लिव-इन मध्ये होती,वादातून हत्या : गाझीपूर भागातील निर्जन ठिकाणी एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेह एका सूटकेसमध्ये भरून जाळल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात उघडकीस आले आहे की, संबंधित महिलेची हत्या गळा दाबून करण्यात आली होती आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या मृतदेहाला जाळण्यात आले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
शिल्पा पांडेचे तिच्या भावासोबत होते संबंध
तपासादरम्यान पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली. ती शिल्पा पांडे असून तिचं वय 22 वर्ष होतं. शिल्पा गेल्या एका वर्षापासून खोड़ा कॉलनीमध्ये अमित तिवारी नावाच्या व्यक्तीसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. शिल्पा सतत अमितवर लग्नासाठी दबाव आणत होती. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अमित हा शिल्पा पांडे चा नात्याने भाऊ होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत.हिंदी मिडियाने चचेरा भाई असे म्हटले आहे. मात्र यामुळे नाते स्पष्ट होण्यास संभ्रम निर्माण होऊ शकतो,कारण चचेरा म्हणजे चुलत असे वाटू शकते पण चचेरा म्हणजे मावशीचा मुलगा किंवा आत्याचा मुलगा असेही काही ठिकाणी म्हटले जाते,मात्र आम्ही हा संभ्रम नको म्हणून नात्याने भाऊ इतकाच उल्लेख केला आहे.
शिल्पा पांडे चचेरे भाई अमित तिवारी के साथ लिव-इन में थी..
— NDTV India (@ndtvindia) January 27, 2025
दिल्ली : गाजीपुर में एक युवक ने अपनी चेचरी बहन की हत्या कर दी, इसके बाद उसकी बॉडी सूटकेस में रखकर जला दी. इस मर्डर मामले में अमित तिवारी और उसके दोस्त अनुज को गिरफ्तार कर लिया गया है. DCP ने बताया कि मृतक लड़की 22 साल की… pic.twitter.com/plifdiBaMf
नशेच्या अवस्थेत केली हत्या
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार,”पीडित हा आरोपीच्या नात्यात चुलत भाऊ होता आणि त्याने कायमचे एकत्र राहण्यासाठी त्याच्यावर त्याचे कुटुंब सोडून जाण्यासाठी दबाव टाकला. पीडिता त्याला आणि त्याच्या कुटुंबाला खोट्या गुंतवून ठेवण्याची धमकीही देत होती,” असे पोलिस निवेदनात म्हटले आहे, अनुजने अमितला मदत केल्याचा आरोप आहे.
25 जानेवारी रोजी अमित नशेत होता, आणि त्याच दिवशी त्याचा शिल्पासोबत पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या अमितने शिल्पा पांडे चा गळा दाबून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर अमितने आपला मित्र अनुज कुमार, जो कॅब ड्रायव्हरचा व्यवसाय करतो, त्याला फोन करून मदत मागितली. अमितने शिल्पाच्या मृतदेहाला पश्चिम उत्तर प्रदेशात कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनामुळे हाय अलर्ट होता. अनेक ठिकाणी चेकिंग सुरू असल्याने अमितने आपला निर्णय बदलला आणि मृतदेहाजवळच लपवण्याचा निर्णय घेतला.
निर्जन भागात नेऊन मृतदेह जाळला
अमित आणि अनुजने शिल्पाचा मृतदेह गाझीपूरमधील एका निर्जन भागात नेऊन पेटवून दिला. पोलिसांच्या मते, ही घटना 26 जानेवारीच्या पहाटे 1:45 वाजता घडली. त्यानंतर अमितने अनुजला सोडून ग्रेटर नोएडाला पळ काढला आणि प्रयागराजला पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस त्याला ताब्यात घेण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी आरोपीला पकडले कसे?
पोलीस तपासात असे समोर आले की, 26 जानेवारी रोजी पहाटे 4:10 वाजता त्यांना गाझीपूर भागात एका जळालेल्या मृतदेहाची माहिती मिळाली.
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना पूर्णपणे जळालेला मृतदेह सापडला.
सीसीटीव्ही तपासणीमध्ये यूपी नंबरची ह्युंडई वर्ना कार दिसली, जी लोनी येथील एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती.
चौकशीत कळले की, ही गाडी अमित तिवारीने विकत घेतली होती. पोलिसांनी अमितला अटक केली आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गाझीपूरसह संपूर्ण दिल्लीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 28,2024 | 17:00 PM
WebTitle – burnt-body-case-ghazipur-delhi-relationship-tragedy