युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य तथा मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद शाखा कोल्हापूर यांच्या वतीने येणारी लेणी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. ऐनारी लेणी ही सह्याद्री पर्वतरांगांच्या डोंगर कपारीत माथ्यावर वसलेली आहे. अति धोक्यात आलेल्या या लेणीवर बुद्ध पौर्णिमे रोजी बुद्ध जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
साधारणता 80 डिग्री मध्ये तीन किलोमीटरचा डोंगर चढून या ऐनारी लेणी पर्यंत जावे लागते. या लेणी थेरवादी परंपरेतील असून या ठिकाणी अर्धवट स्तूप, शून्यागार, अष्टकोनी खांब, बौद्ध भिख्खू यांची ध्यानसाधना आणि अभ्यास करण्याची जागा इत्यादी बौद्ध लेणीची लक्षणे दिसून येतात. अनेक खांबांची पडझड झालेली दिसते तसेच अनेक शून्यगारांच्या भिंती तुटलेल्या अवस्थेत पहायला मिळतात.
या लेणी तातडीने संवर्धन करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. बुद्ध पौर्णिमेरोजी या लेणीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला तसेच बुद्ध वंदना घेऊन लेणीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी युवा बौद्ध धम्म परिषदचे राज्याध्यक्ष प्रा. डॉ. संतोष भोसले तसेच लेणी अभ्यासक आणि संवर्धक संदेश पाटील आणि विजय पाटील उपस्थित होते.
प्रा.डॉ.संतोष भोसले
युवा बौद्ध धम्म परिषद राज्याध्यक्ष
The Kerala Story द केरळा स्टोरी चित्रपटावर सरकारची बंदी!
मणिपूर हिंसा का झाली जाणून घ्या,शूट एट साईट चे आदेश
आई कर्ज फेडू शकली नाही; 30 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षाच्या मुलीशी लग्न
कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 10,2023 17:44 PM
WebTitle – Buddha Purnima celebration at Ainari Caves