Jharkhand Seema Patra झारखंड : एका आदिवासी महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजप च्या महिला नेत्या सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. सीमा पात्रावर आपल्याच मोलकरणीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. राज्यपाल रमेश बैस यांनीही याप्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागवला होता. सीमा पात्रा या भाजप च्या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या. त्यांचे पती महेश्वर पात्रा हे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत,हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने या महिलेला निलंबित केले आहे.
भाजप महिला नेत्याने आदिवासी महिलेवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
पीडित आदिवासी महिला सुनीता गेल्या आठ वर्षांपासून भाजप महिला नेता सीमा पात्रा च्या घरी काम करत होती. पोलिसांनी या पीडित महिलेला सीमाच्या तावडीतून सोडवले तेव्हा तिची प्रकृती खूपच खराब होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून, सुनीताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती तिच्यासोबत झालेल्या दुःखाचे वर्णन करताना दिसत आहे. भाजप महिला नेता सीमा पात्रा अनेकदा लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करत असे, असा आरोप आदिवासी महिलेने केला आहे. तिला खूप राग आला की ती गरम चिमटे आणि छिन्नीने शरीरावर चटके द्यायची. सीमाने तिला गेली दोन वर्षे घरात डांबून ठेवले होते. खोलीत शौच केल्यावर ते चाटून साफ करण्यास भाग पाडले जाई,तिच्यावर झालेल्या मारहाणीमुळे तिचे अनेक दात पडले आहेत.एवढा प्रचंड क्रूर प्रकारचा अत्याचार तिच्यावर झाल्याचे यावरून स्पष्ट होते.
मुलानेच उघड केलं आईचं क्रूरतेचं कृत्य
पीडित सुनीताला सीमा पात्रा यांच्या मुलाने मदत केली. सुनीतावरचा क्रूरपणा त्याला सहन न झाल्याने अखेर त्याने त्याच्या मित्राची मदत घेतली, त्याच मित्राने झारखंड पोलिसांना कळवले आणि सुनीताची तेथून सुटका केली.जर या मुलाची संवेदना जागली नसती तर? सुनीता तिथच कायमची संपली असती..
या प्रकरणावरून गदारोळ होताच भाजपने सीमा यांना निलंबित केले. यानंतर राज्यपालांनी कारवाई न केल्याबद्दल पोलिसांकडून अहवालही मागवला होता. राजभवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुनीतावर अत्याचार झाल्याच्या वृत्ताची रमेश बैस यांनी दखल घेतली आहे. निवेदनानुसार- “राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि दोषी व्यक्तींवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांना विचारला आहे. राज्यपालांनीही पोलिसांच्या या ढिलाई अन हलगर्जीपणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली..”
त्यानंतर बुधवारी सकाळी सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
धुळे येथे बौद्ध समाजावर मनुवाद्यांनी टाकला बहिष्कार,पाणी,दूध,किराणा,बंद
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 31,2022, 18:20 PM
WebTitle – BJP woman leader Seema Patra forced tribal woman to lick the toilet and urine