सोनभद्र: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील दुधी विधानसभा मतदारसंघातील भाजप चे विद्यमान आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा जाहीर केली.BJP MLA Ramdular Gond sentenced to 25 years for raping a minor girl जवळपास 9 वर्षे चाललेल्या प्रदीर्घ खटल्यात अलीकडेच न्यायालयाने भाजप आमदार रामदुलार गोंड यांना दोषी ठरवले होते. आता शुक्रवारी या खटल्याचा निकाल देताना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी भाजप आमदाराला 25 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडापैकी 10 लाख रुपये पीडितेच्या पुनर्वसनासाठी दिले जातील.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
4 नोव्हेंबर 2014 रोजी, उत्तर प्रदेशातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ दूधी-403 चे विद्यमान आमदार रामदुलार गोंड यांच्यावर या भागातील एका अल्पवयीन मुलीने बलात्कार आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. एक वर्षापासून आमदार सतत तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी पीडितेचे वय अवघे १५ वर्षे होते. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रामदुलार गोंड यांची पत्नी सुर्तन देवी या गावच्या प्रमुख होत्या आणि रामदुलार गोंड यांची प्रतिमा एका (दबंग) ताकदवर नेत्याची होती.
यानंतर रामदुलार गोंड यांचे राजकीय वजन वाढत गेले आणि 2022 मध्ये ते भाजपच्या दुधी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
दरम्यान,विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास सुरूच होता, आमदार होण्याच्या काही दिवस आधी
पोलिसांनी अंतिम अहवाल न्यायालयात सादर केला होता.
आमदार झाल्यानंतरही रामदुलार गोंड न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडत राहिले,
मात्र 12 डिसेंबर 2023 रोजी खासदार-आमदार न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश
एहसानुल्ला खान यांच्या न्यायालयात त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
रामदुलार गोंड चे जाणार सदस्यत्व?
शुक्रवारी न्यायालयाने दुधीच्या आमदाराला 25 वर्षांची शिक्षा सुनावली आणि 10 लाखांचा दंडही ठोठावला. पीडितेचे वकील विकास शाक्य यांनी सांगितले की, न्यायालयाने दुधी आमदाराला 25 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे.दंडाची रक्कम पीडितेला पुनर्वसनासाठी दिली जाईल. शिक्षेची घोषणा झाल्यानंतर भाजप आमदाराचे सदस्यत्व गमवावे लागू शकते. दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास विधानसभेच्या सदस्यांची विधानशक्ती रद्द होते, असा नियम आहे. नुकतेच आझम खान आणि ओमर अब्दुल्ला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
श्रेयस तळपदे ला हार्ट अटॅक,पत्नीने दिली मोठी अपडेट
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 15,2023 | 21:30 PM
WebTitle – BJP MLA Ramdular Gond sentenced to 25 years for raping a minor girl