मुंबई, दि. 30 : राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख रु. याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.
ही योजना MH-CET, NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000/-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी आहे व मुख्यत: लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटित क्षेत्रात, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.
सन -2021 इयत्ता 10 वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी https://barti.maharashtra.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील
तसेच संबंधित निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना बार्टीमार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येतील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास SSC, CBSE, ICSE बोर्डांमध्ये मध्ये 90% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील शासकीय नोकरीत आहेत ते विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र राहणार नाही.
ही विशेष अनुदान योजना सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व यापुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देय असेल, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, पुणे यांच्यामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 30 , 2021 20 : 30 PM
WebTitle – Appeal regarding Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Special Grant Scheme 2021-06-30