कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत करण्यात आला आहे.8-0 vote म्हणजे निर्विवाद बहुमताने मतांनी हा कायदा संमत करण्यात आला.The Senate Judiciary of California cleared bill SB403 (Anti Caste Bill) by 8-0 जगातील काही मोठ्या टेक कंपन्या कॅलिफोर्नियामध्ये आहेत.यामध्ये मोठ्या संख्येने दक्षिण आशियाई लोकांना त्यांच्या कामगारांमध्ये नियुक्त करणाऱ्या या कंपन्यांमध्ये जाती-आधारित भेदभाव प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याची आकडेवारी समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात होती.
कॅलिफोर्निया जातीय भेदभाव बंद करण्यासाठी विधेयक
22 मार्च रोजी, डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार असलेल्या सिनेटर आयशा वहाब यांनी
कॅलिफोर्नियाच्या सिनेटमध्ये यासंदर्भात विधेयक सादर केले.
ज्याचा उद्देश राज्याच्या भेदभावविरोधी कायद्यांमध्ये संरक्षित श्रेणी म्हणून जात जोडण्याचा आहे.
हे नागरिकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये जात-आधारित छळापासून संरक्षण प्रदान करेल.
“आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की संस्था आणि कंपन्या त्यांच्या कार्यकारी पद्धती किंवा धोरणांमध्ये जातीय भेदभाव करू नयेत आणि ते करण्यासाठी आम्हालाही हे स्पष्ट केले पाहिजे की जातीवर आधारित भेदभाव कायद्याच्या विरोधात आहे,” तिने एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
“जात धर्म आणि राष्ट्रीयतेच्या पलीकडे जाते. हा कायदा प्रामुख्याने अशा लाखो लोकांचे संरक्षण करतो जे शांतपणे राहतात आणि त्यांना कधीही असे संरक्षण मिळालेले नाही कारण या जात आधारित भेदभाव समस्येची फारशी समज नाही. हे विधेयक असुरक्षित लोकांच्या संरक्षणासाठी आहे,” अनेकांना कामावर जातीय भेदभावाचा सामना करावा लागला आहे,” असे वहाब यांनी सांगितले”असंही वहाब म्हणाल्या.
Hindu American Foundation opposes the anticaste bill
हिंदू अमेरिकन फाउंडेशन Hindu American Foundation या तथाकथित उच्चजातीय संघटनेने या कायद्याला विरोध केला आहे.
या बेकायदेशीर आणि भेदभाव करणाऱ्या विधेयकाचा आम्ही लढा सुरूच ठेवू.असा त्यांनी पवित्रा घेतला आहे.जातीय भेदभाव विरोधी कायद्याला हिंदू अमेरिकन फाउंडेशन हिंदु फोबिया अॅंटी हिंदू असं म्हणत थयथयाट करताना दिसत आहे.
हिंदू अमेरिकन फाउंडेशन Hindu American Foundation आणि त्याच्याशी जोडलेल्या लोकांना जातीयवाद करणे हीच आपली नैसर्गिक संस्कृती परंपरा असल्याचा भ्रम झाला असावा,त्यामुळे आम्हाला जातीयवाद करण्यास अटकाव करणाऱ्या या कायद्याचा आम्ही विरोध करतो असा त्यांनी पवित्रा घेतला असावा असं मत कायद्यानेवागा लोकचळवळीचे अध्यक्ष संपादक राज असरोंडकर यांनी जागल्याभारत शी बोलताना मांडलं.
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 26,2023 13:40 PM
WebTitle – Anti-Caste Bill Passed in California