ज्येष्ठ समीक्षक रावसाहेब कसबे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी हे परस्परपूरक आहेत अशी स्वप्ने पडू लागली आहेत. रावसाहेब कसबे यांनी अशी वक्तव्ये अनेकदा केली आहेत. गांधी यांनी स्वतः ते सनातनी हिंदू असल्याचे त्यांच्या एकंदरीत वर्तनातून अनेकदा सिद्ध केले आहे. याचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुलाखतीत मिळेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बिबीसीला दिलेल्या मुलाखतीत साफ शब्दात सांगीतले आहे की गांधींनी बाबासाहेब आंबेडकर यांना कशी वागणूक दिली होती.
बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्याने अतिमागास लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली होती.
दुसरा संदर्भ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेले आणि महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तकरुपी भाषण. या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. बाबासाहेब म्हणतात की गांधींच्या मते मी त्यांच्या बागेतील साप आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मात असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा यांना आव्हान देत होते.अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, जातीचे निर्मूलन करण्यासाठी, मागासवर्गीय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहोरात्र झटत होते. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व सामाजिक लढे हे समतेसाठी होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याने मागास, अतिमागास, आदिवासी, महिला प्रेरीत झाले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्याने अतिमागास लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली होती. ज्या समाजघटकांना 2500 वर्षापासून गुलामगिरीत रहावे लागले ते सर्व घटक बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र आणण्याचे प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.
एखादा ब्राम्हण भंगीकाम करण्यास तयार होईल का?
गांधी यांचा अस्पृश्य लोकांकडे बघण्याचा कल हा भूतदयेतुन आला होता.अस्पृश्य हे हिंदू धर्माचे घटक आहेत
आणि त्यांना हिंदू धर्मापासून पृथक करता येणार नाही असे त्यांचे मत होते.
उच्चवर्णीय हिंदूंनी अस्पृश्य लोकांकडे उदारमतवादी होऊन पहावे, जातीयता नष्ट करण्यासाठी सहभोजन करावे,
आंतरजातीय विवाह करावेत असे त्यांचे मत होते. हे सर्व केल्याने जातीयता नष्ट होईल असा त्यांचा भाबडा आशावाद होता.
गांधी यांना पुरोहित व्यवसाय आणि भंगी व्यवसाय यामध्ये फार फरक वाटत नव्हता.
याचे स्पष्टीकरण देताना गांधी म्हणतात की, “अध्यात्मिक शिक्षक असलेल्या ब्राम्हणाचा व्यवसाय आणि भंग्याचा व्यवसाय समान आहे.
त्याचे योग्य पालन देवाकडून समान पुण्य प्रदान करते.”
(जातीव्यवस्थेचे निर्मूलन, पान क्रमांक 72) या उदाहरणाद्वारे गांधी हे सांगतात की ब्राम्हण आणि भंगी यांनी जातीव्यवस्थेने दिलेले काम बिनबोभाटपणे करावे.
गांधींना हा प्रश्न कुणितरी विचारायला हवा होता की ब्राम्हण
आणि भंगी यांचे व्यवसाय जर समान असतील तर त्यांच्या व्यवसायाची अदलाबदली करणेबाबत हिंदू धर्मात काय तजवीज आहे?
समान पातळीवर असलेले व्यवसाय बदलता येणार का? एखादा ब्राम्हण भंगीकाम करण्यास तयार होईल का?
गांधी हे धार्मिक पातळीवर आणि भावनेच्या आधारावर अस्पृश्यता नष्ट न करता सर्व जातींमध्ये एकोपा करण्यासाठी प्रयत्नशील होते.
गांधी वर्णव्यवस्थेला तसूभरही धक्का न लावता उच्चवर्णीय
आणि मागासवर्गीय लोकांचे मनोमिलन करुन एकोपा साधण्याचा प्रयत्न करत होते.
अध्यात्मिक पातळीवर सर्वांना एकत्र करण्यासाठी ते प्रयत्नशील होते.वर्णव्यवस्थेचे खंदे पुरस्कर्ते असणारे गांधी सनातनी हिंदू होते.
फोडा आणि राज्य करा’
याउलट बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात असलेल्या अनिष्ट वर्णव्यवस्थेला फोडून काढले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय मार्गाने मागासवर्गीय लोकांना हक्क आणि अधिकार देण्याचा मार्ग अवलंबला होता.
पुणे करार हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरतो तो यामुळेच.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये मागासवर्गीय लोकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी करार झाला त्यास येरवडा करार म्हणतात. गांधी मागासवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांमध्ये इंग्रज ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीचा अवलंब करत असल्याचा आरोप करत उपोषणास बसले होते.
1932 ला बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी राजवटीकडून मागासवर्गीय लोकांसाठी वेगळे मतदारसंघ मागत होते. गांधींना भय होते की वेगळे मतदारसंघ दिले तर हिंदू धर्मापासून मागासवर्गीय वेगळे होतील. धर्म व्यवस्थेला आणि वर्णव्यवस्थेला तो जबरदस्त धक्का असेल म्हणून त्यांनी उपोषण केले. नंतर जो करार करण्यात आला त्यात वेगळे मतदारसंघ न देता प्रत्येक प्रांतात पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचे ठरले.
जोगेंद्रनाथ मंडल यांनी मुस्लिम लीगच्या मदतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत पाठवले.
बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत जाण्यापासून रोखण्यासाठी कॉंग्रेसने खूप प्रयत्न केले. पटेल, नेहरू, राजेंद्र प्रसाद हे बाबासाहेब आंबेडकर यांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होते. पटेलांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत येऊ नये म्हणून दारे, खिडक्या आणि फटीही बुजवल्या असे उद्गार काढले आहेत त्यावेळेस बंगालमधील जोगेंद्रनाथ मंडल यांनी मुस्लिम लीगच्या मदतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत पाठवले. असे असताना पण कॉंग्रेसने ज्या जिल्ह्यातून बाबासाहेब निवडून गेले होते त्या जिल्ह्यांना पुर्व पाकिस्तानला बहाल केले. सहाजिकच बाबासाहेब पाकिस्तानच्या संविधान सभेत गेले. भारतीय संविधान सभेची सदस्यता आपसूकच कॉंग्रेसने रद्द केली.
जेव्हा काही आशाच दिसत नव्हती तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान न स्वीकारण्याची धमकी दिली आणि हा राजकीय मुद्दा बनवला जाईल असे जाहीर केले. इतके सगळे झाल्यानंतर कॉंग्रेसने मुंबई प्रांतातील जयकर यांनी राजीनामा दिला आणि त्या जागेवर बाबासाहेब बिनविरोध निवडून जातील अशी व्यवस्था केली. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत जाणे हे कोणत्याही तत्कालीन कॉंग्रेसवाल्यांना नकोच होते. ते बाबासाहेब आंबेडकर यांचा उघड द्वेष करत. नेहरु, पटेल, राजेंद्र प्रसाद यांनी सर्व काही प्रयत्न केले पण बाबासाहेब आंबेडकर यांना ते संविधान सभेत येण्यापासून रोखू शकले नाहीत.
मसुदा समितीचे अध्यक्ष
त्यांच्या नाईलाजाने का होईना बाबासाहेब संविधान सभेत गेले. नंतर मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला नावलौकिक यामुळे त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले. यामध्ये गांधींचे काही योगदान नाही. तत्कालीन कॉंग्रेसची आणि तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांची मजबुरी होती. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहावे असे कोणालाही वाटत नव्हते. कॉंग्रेसने परदेशस्थ विद्वानांना पण संविधान लिहिण्यासाठी साकडे घातले होते. पण ते सफल झाले नाहीत.
वरील सर्व मुद्यांवर चर्चा करता बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी हे परस्परपूरक आहेत असे रावसाहेब कसबे यांचे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे हे स्पष्ट होते. गांधी हे सनातनी हिंदू तर बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक. गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ हा नारा दिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी ‘खेडी ही जातीयतेची आगर आहेत, शहराकडे चला’असा नारा दिला. एक स्वप्नाळू अध्यात्मिक वाटेवरचा पथिक तर दुसरा राजकीय, सामाजिक विद्वान. एक भाबडा आशावाद बाळगणारा तर दुसरा कायदेशीररीत्या न्याय मार्गाने चालणारा. ही दोन टोके परस्परपूरक कशी होऊ शकतात? रावसाहेब कसबे यांनी याबाबत माहिती द्यावी.
आई आणि दाईमध्ये खूप फरक असतो
एका विशिष्ट जातसमुहाला खुश करण्यासाठी, स्वताच्या स्वार्थासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा उपयोग करून घेणे तथाकथित लेखक, समीक्षकांनी थांबवावे. इतिहासात काही परस्परविरोधी टोके असतात. त्यांना परस्परपूरक बनवण्याचे पाप करु नये. गांधी आणि आंबेडकर हे परस्परपूरक कधीच नव्हते. दोघांचेही सामाजिक कार्य परस्परपूरक कधीच नव्हते. मागासवर्गीय लोकांना बाबासाहेब आई वाटतात तर गांधी दाई वाटतात. आई आणि दाईमध्ये खूप फरक असतो इतके समजले तर पुरेसे आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारात जो फरक आहे तो राहीलच. गांधींनी बाबासाहेब आंबेडकर यांना जागतिक पातळीवर नेले असे बोलणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, बॅरीस्टर, संविधान निर्माता, भारतीय मागासवर्गीय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध आहेत. चुकीचे नरेटिव्ह सेट करण्यात कोणाचा काय फायदा होणार आहे हे सूज्ञ लोक जाणतात. अशा प्रकारच्या भूमिका घेणारे लोक बाबासाहेब आंबेडकर यांचे दिवसेंदिवस वाढते महत्त्व कमी करण्यासाठी झटतात हेच खरे आहे.
by सतिश भारतवासी कोल्हापूर
लेखक आंबेडकरी चळवळ अभ्यासक आहेत.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)