20 जानेवारी 2025|बदलापूर – बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरविषयी फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शिंदेच्या बंदुकीवर त्याचे फिंगरप्रिंट असल्याचा दावा केला होता. मात्र, फॉरेन्सिक तपासणीत बंदुकीवर अक्षय शिंदे चे फिंगरप्रिंट पूर्णपणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोर्टाचा पोलिसांवर ठपका
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर बळाचा चुकीचा वापर केल्याचा ठपका ठेवला आहे. न्यायालयीन चौकशी समितीने पोलिसांच्या स्वसंरक्षणार्थ गोळीबाराच्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. फॉरेन्सिक अहवालात पोलिसांचा दावा खोटा ठरवण्यात आल्याने हा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे.
घटनेचा घटनाक्रम
अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिस ठाण्याकडे नेण्यात येत असताना, त्याने अचानक पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन फायर केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या फायरिंगमध्ये एक गोळी API निलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर दोन गोळ्या मिसफायर झाल्या. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ शिंदेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
फॉरेन्सिक अहवालात पोलिसांचा दावा फोल
फॉरेन्सिक अहवालात अक्षय शिंदे च्या हाताचे फिंगरप्रिंट बंदुकीवर सापडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या दाव्याला छेद मिळाला आहे. हा अहवाल पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो.
सुषमा अंधारे यांची सीबीआय चौकशीची मागणी
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर गंभीर शंका उपस्थित करत, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.
त्यांनी म्हटले होते की, “अक्षय शिंदेने स्वत:वर गोळी झाडली का, की त्याला गोळीबाराला प्रवृत्त करण्यात आले? कुटुंबीयांचा दावा आहे की, अक्षयला फसवण्यात आले आहे. त्यामुळे याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.”
एनकाउंटर नंतर राज्यात खळबळ
या एनकाउंटर प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ माजली होती.
या घटनेचे सत्य समोर आणण्यासाठी स्थानिकांसह विविध संघटनांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 20,2024 | 14:05 PM
WebTitle – akshay-shinde-no-fingerprints-on-gun-badlapur-case