06 जानेवारी 2025 | पुणे: निवडणुकीच्या काळात नेते अनेक वचनं देतात, जनतेला प्रलोभने दाखवतात, आणि स्वतःला “जनतेचे सेवक” म्हणवून घेतात. गरिबांच्या घरी जेवायला जाणं, भेटीगाठी घेणं, किंवा एक छोटा फोटो काढून तो व्हायरल करणं हे दृश्य आपण वारंवार पाहतो. एक तर फोटो लहान मुलाला धुताना सुद्धा व्हायरल झालेला आपण पाहिला असेल,मात्र, निवडणुकीनंतर हाच नेता अनेकदा जनतेला विसरतो, अशी भावना अनेकदा व्यक्त होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक शैलीमुळे कायम चर्चेत असतात.
त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे ते अनेकदा वादातही अडकतात. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
बारामतीतील कार्यक्रम आणि अजित पवारांचा संताप
रविवारी, बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. मेडद या गावात बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरातील नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार नागरिकांशी संवाद साधत होते आणि त्यांच्याकडून आलेल्या निवेदनांवर अधिकाऱ्यांना सूचना देत होते.अजित पवारांनी या दौऱ्यात विविध विकासकामांची पाहणी केली. त्यांनी स्पष्ट केलं की विकासकामं वेगाने पूर्ण व्हावीत आणि नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत.
अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची छाप सोडली आहे.
अजित पवार म्हणाले “मला सालगडी केलंय का?”
कार्यक्रमादरम्यान एका कार्यकर्त्याने अजित पवारांकडे आपली कामे झाली नसल्याची कैफियत मांडली.
यावर इतर नागरिकांनीही आपापल्या अडचणी सांगण्यास सुरुवात केली.
यामुळे अजित पवार चांगलेच संतापले आणि त्यांनी रोखठोक उत्तर दिलं, “अरे, तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.त्यांच्या या वक्तव्यामुळे आता बारामती आणि राज्यभर त्यांच्यावर चर्चा सुरू झाली आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 06,2024 | 10:45 AM
WebTitle – Ajit Pawar lashed out at the citizens remarks salgadi