मुंबई : राज्यात राजकीय नाट्य थांबण्याचे नाव घेत नाही.उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेला अजित पवार यांचा गट शरद पवार यांच्या भेटीला आला.अजित पवार गटाने भाजप सोबत हात मिळवणी करत सत्तेत स्थान मिळवत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार भाजपकडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि राज्याचे अर्थमंत्री पदही देण्यात आले. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी मधिल जेष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, तसेच आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम यांनीही भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेत सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारलंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्या सर्व नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेत एकसंध राहण्याची विनंती केली.
या भेटीबद्दल विचारलं असतं जयंत पाटील म्हणाले मला याबाबत काहीच माहिती नाही,
सुप्रिया पवार यांचा मला फोन आला होता की पवार साहेबांनी वाय. बि. सेंटरला बोलावलं आहे,
त्यामुळे फोन आल्यावर मि तिथं तातडीने निघालो.अजित पवार गटाच्या भेटीची कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल पटेल यांनी सांगितलं कारण
आज अजित पवार गटाचे मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले.यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.पुन्हा काहीतरी राजकीय धक्का असणार का याबद्दल चर्चा सुरू झाली,दरम्यान,भेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल यांनी माहिती दिली की आम्हाला समजलं होतं की शरद पवार साहेब वाय. बि. सेंटर ला एका मिटिंगसाठी येणार आहेत,म्हणून आम्ही त्यांना कोणतीही सूचना न देता सर्वांनी भेट घेण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे आम्ही भेट घेतली,आम्ही त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी ही भेट घेतली आहे.शरद पवार आमचे दैवत आहेत,आम्ही पाया पडून त्यांचे आशिर्वाद मागितले.यासोबतच आम्ही साहेबांना विनंती देखील केली की आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच परंतु राष्ट्रवादी हा पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसात मार्गदर्शन सुद्धा करावं.शरद पवार साहेबांनी आमचे विचार विनंती शांतपणे ऐकून घेतली.मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मेरठ एक्सप्रेस हायवेवर शाळेची बस रॉंगसाइडने सुसाट ; 6 जणांचा मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 16,2023 | 18:05 PM
WebTitle – Ajit Pawar group met Sharad Pawar