मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी लोक माझे सांगाती या पुस्तकाचे पुन:संपदान करत प्रकाशन केले,यावेळी त्यांनी मोठा निर्णय जाहीर करून सर्वानाच धक्का दिला.शरद पवार यांनी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मिडियावरही जोरदार चर्चा पाहायला मिळत असून. शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले.यावेळी काहींनी आक्रमक भूमिका घेतली आणि शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तसे न केल्यास आपणही राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला गेला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेतेमंडळींनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर येथे भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
“आम्ही काहीजण, विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रोहित पवार, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड असे सर्वजण सिल्व्हर ओक येथे भेट घेतली आहे. आम्ही शरद पवारांना सांगितलंय की सगळ्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. त्यांनी मला, रोहित आणि छगन भुजबळांना सांगितलं, सुप्रियाशी काही गोष्टी फोनवर बोलले आहेत”, असं माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले.
शरद पवार करणार राजीनामा निर्णयाचा फेरविचार?
“शरद पवार म्हणाले की मी माझा निर्णय सांगितला. परंतु तुमच्या सर्वांच्या आग्रहामुळे मला फेरविचार करायला दोन ते तीन दिवस द्या.
आपण शरद पवार साहेबांना दैवत मानतो. आता तेच म्हणत आहेत की मला २-३ दिवस द्या.
तर आपण सर्वांनी त्यांचं ऐकायला पाहिजे. ते म्हणाले मी विचार तेव्हाच करीन जेव्हा सगळे कार्यकर्ते आपापल्या घरी जातील.
साहेब म्हणाले मला इथे एकही कार्यकर्ता दिसायला नको.मला कुणी इथं बसलेले दिसले तर मात्र मी माझा निर्णय बदलणार नाही”, असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
आई कर्ज फेडू शकली नाही; 30 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षाच्या मुलीशी लग्न
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 02,2023 21:00 PM
WebTitle – Ajit Pawar gave big news on Sharad Pawar’s resignation decision