मध्य प्रदेशातील रीवा येथे 6 जुलै रोजी झालेल्या अंधश्रद्धेतून नरबळी हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन मुलींनंतर मुलगा होण्याचा नवस पूर्ण झाला म्हणून वडिलांनी गावातील तरुणाचा नरबळी दिला. मंदिरातील देवी मातेसमोर या तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील बैकुंठपूर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या बेढ़ौआ गावचे आहे. ६ जुलै रोजी पुरातन फुलमती माता मंदिराच्या दारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मागून मानेवर कुऱ्हाडीने वार करून युवकाचा खून करण्यात आला होता. ही बाब संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी एक कुऱ्हाड जप्त केली. क्योटी गावातील 18 वर्षीय दिव्यांश कोल असे मृताचे नाव आहे.
तपासादरम्यान पोलिसांना कळले की घटनास्थळाजवळच गावातील एक व्यक्ती रामलाल प्रजापती क्योटी गावात दिसल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक खुलासा समोर आला.
त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला तीन मुली असून त्यानंतर मुलगा होण्यासाठी त्याने देवीला नवस केला होता.
त्या बदल्यात देवी मातेला बळी देण्याचे ठरवले. जेव्हा त्याला मुलगा झाला
तेव्हा नवसानुसार त्याला एका तरुणाचा देवीमातेला बळी द्यावा द्यायचा होता.
यासाठी घटनेच्या तारखेला त्याला हा तरुण शेळ्याना चरायला घेऊन आलेला दिसला.
सगळीकडे सामसुम झाल्यावर प्रजापतीने त्या तरुणाला बेढ़ौआ गावात असलेल्या देवी मंदिरात आणले.
हे मंदिर अगदी निर्जन ठिकाणी होते, तिथे त्याने कुऱ्हाडीने गळा चिरून या तरुणाचा खून केला.
घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
सिरमौर एसडीओपी नवीन तिवारी यांनी सांगितले की, बेढ़ौआ गांवात देवीच्या पुतळ्यासमोर गळा चिरून एका तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची सतत चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत त्याने नवसाचा बळी दिल्याची माहिती दिली आहे. या घटनेचा सातत्याने तपास सुरू आहे. चौकशीअंती जे तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल.आरोपी तंत्र मंत्र जादूटोणा इत्यादी अघोरी प्रकार करत असल्याची माहिती समोर आलीय.याआधीही त्याने मंदिरात स्वत:चा हात कापून रक्त अर्पण केले आहे.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
अवैध संबंधप्रकरणी दोषी ठरलेल्या महिलेला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा
इराण च्या मुस्लिम महिला हिजाब पासून स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरल्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 16, 2022, 11:11 AM
WebTitle – After fulfilling the vow to be a son, the father took the boy to the temple and sacrificed the young man