मुंबई दि 08 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर हे पुढील तीन महीने सक्रीय राजकारणापासून अलिप्त राहणार आहेत.
वैयक्तिक कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. या संदर्भात त्यांनी सोशल मिडियात एक व्हिडीओ प्रकाशीत केला आहे.
या व्हिडीओ संदेशात त्यांनी आपण पुढील तीन महिने सक्रीय राजकारणापासून अलिप्त राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच पक्ष चालला पाहिजे संघटन चालले पाहिजे,आपण आंदोलनाची सुरुवात केली आहे.पांच जिल्ह्यात निवडणूका आहेत.पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची निवड करण्यात येत आहे.
डॉ. अरुण सावंत महाराष्ट्र कमिटी जिल्हा कमिटी आणि इतर सर्व कार्यकर्ते त्यांना मदत करून पक्षाची यशस्वीरित्या पुढील वाटचाल करतील आणि रेखाताई ठाकूर यांना सहयोग करतील.
असं अॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचं काम व्यवस्थित सुरू राहावं त्यासाठी व्हिडीओ करून
रेखाताई ठाकूर यांना सहकार्य करण्याचं आवाहन अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021
Vanchit Bahujan Aghadi
‘…म्हणून मराठा आरक्षण गेले’ ; प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 08, 2021 22 : 10 PM
WebTitle – Prakash Ambedkar will stay away from active politics for the next three months 2021-07-08