कोरोनाचे जागतिक संकट अजूनही जगात हाहाकार माजवत आहे.काही देशातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. तर काही ठिकाणी लाट ओसरताना दिसते,तर काही देशांनी अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे.भारतात सुद्धा अनलॉक ची प्रक्रिया सुरू झालेली आहे.मात्र रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही.अशातच सर्व धर्मीय लोकांनी यावर्षी आपल्या सालाबादप्रमाणे येणाऱ्या मोठ्या सण उत्सव आणि इतर महत्वाच्या दिवशी करण्यात येणारे कार्यक्रम रद्द केले किंवा अतिशय कमी संख्येने फिजिकल डिस्टन्सिंग पाळत एक उपचार म्हणून ते पार पाडण्यात आले.निश्चितच लोकाना कोरोनाचे गांभीर्य समजलेलं आहे.महापरिनिर्वाण दिनानिमित्त एड.प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.
आंबेडकरी अनुयायांनी ऑनलाईन पद्धतीने साजरी केली
आंबेडकरी जनतेनेही सुज्ञपणा दाखवत नेहमीप्रमाणे विवेकी भूमिका घेत
यावर्षीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच राहून साजरी केली.
यावेळी आंबेडकरी तरुणांनी सोशल मिडियातून मोठ्याप्रमाणावर आवाहन
आणि जनजागृती केल्याने 14 एप्रिल 2020 ची जयंती ही आंबेडकरी अनुयायांनी ऑनलाईन पद्धतीने साजरी केली.
अनेक आंबेडकरी माध्यमे यात अग्रभागी होती,जागल्या भारत सुद्धा यात सामील होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि त्यांची पुण्यतिथी म्हणजेच महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर हे दोन दिवस आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत महत्वाचे दिवस आहेत.आणि या दोन्ही दिवशी आंबेडकरवादी नागरिक मोठ्याप्रमाणावर एकत्र जमत असतात. वैचारिक पातळीवरील विविध कार्यक्रम,उपक्रम यावेळी केले जातात.तसेच दादर येथील चैत्यभूमीवर संपूर्ण देशातून भीमसागर उसळतो.डिसेंबरच्या चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत असे चार दिवस देशातील सर्व रस्ते,सर्वप्रकारची वाहने ही चैत्यभूमी दादरच्या दिशेने ओसंडून वाहत असतात.
अभिवादन करण्यासाठी अभिनव पद्धतीचा अवलंब
मात्र या वर्षी कोरोना म्हणजेच कोविड 19 चे अभूतपूर्व असं संकट संपूर्ण जगावर ओढवलेले असताना
आंबेडकरी समाजाने सुद्धा यात विवेकी भूमिका घेत कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपले अमूल्य योगदान दिले आहे.
अनेकांनी यावर्षी अभिवादन करण्यासाठी अभिनव पद्धतीचा अवलंब केला आहे.
प्रत्येकजण वैयक्तिक पातळीवर एक पोस्टकार्ड चैत्यभूमी दादर या पत्यावर पाठवत आहे.
कदाचित हा एक प्रकारचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त एड.प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
संविधान निर्माते,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर हे कायम विवेकी विचार करणारे नेते म्हणून ओळखले जातात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वर्षीच्या जयंतीला सुद्धा त्यांनी आवाहन केले होते आणि आताही त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आंबेडकरवादी सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेला आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की यावेळी घरूनच अभिवादन केले तर अधिक चांगले आहे.
मुंबई (उपनगर),ठाणे,पालघर, (या ठिकाणची जनता जी दादर मुंबईच्या जवळपास राहते आणि जे की खाजगी वाहनांनी येण्याची शक्यता आहे.)
अशा लोकांनाही मास्क चा वापर करणे,फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करणे गर्दी टाळणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
विशेष करून आताच्या तरुण पिढीला त्यांनी सावध करत आवाहन केले आहे की रात्री अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या तरुणांनी विशेष काळजी कोरोना च्या पार्श्वभूमीवर घ्यायला हवी,कोरोना पसरू देवू नये आणि कोरोना पसरवला असा आरोप होऊ देवू नये याची दक्षता तरुणांनी घेऊन अभिवादन करावं.
आपलं अभिवादन कृतज्ञता ही घरूनच
जागल्या भारत च्या माध्यमातून आम्हीही तमाम आंबेडकरी जनतेला आवाहन करतो आहोत.या वर्षीचे अभिवादन आपण सर्वांनी घरूनच करावे.पुढील वर्षी दुप्पट संख्येने जाता येईलच.मात्र आंबेडकरी जनता ही इतिहास बदलणारी जनता असल्याने कोरोनाच्या काळात घडलेल्या कृती,आणि भाष्य यांची सुद्धा इतिहासात नोंद केली जाणार आहेत.त्यामुळे आपली कृती ही कायम विचारी विवेकी अशीच असेल याची आपण काळजी घेत आलो आहोत आणि पुढेही घेऊच.त्यामुळे आपलं अभिवादन कृतज्ञता ही घरूनच होईल.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)