रायगड: किल्ले रायगडावर एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे.छत्रपती शिवसमाधी समोर राखेने पुस्तक पूजण्याचा प्रकार समोर आला आहे.हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर दोघाजणांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.महाड तालुका पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी दुपारी किल्ले रायगडावरील शिवसमाधी समोर पुस्तक पूजन सुरू असल्याचे काही शिवप्रेमींच्या लक्षात आलं.या प्रकाराची अधिक माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली.पुस्तक पूजन करणाऱ्यांकडे एक डबा आढळून आला त्यामध्ये राख असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर उपस्थित शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत ही माहिती पोलिसांना कळवली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून राख आणि पुस्तक ताब्यात घतेली.तसेच याप्रकरणी दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसानी ताब्यात घेतलेली राख लॅब मध्ये तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे.
एक ट्विटर युजरने ही मानवी हाडांची राख असल्याचे म्हटलं आहे.
आकाश सावंत म्हणतात काल रायडावरून पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतल आहे रायगडावर उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीच्या मते ही लोक मानवी हाडांची राख घेऊन तिथे आली होती. ती राख चंदन आणि अत्तरात मिसळून महाराजांच्या समाधीवर लेप लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे प्रकरण खूप गंभीर आहे, ज्यांना ताब्यात घेतलं आहे त्या लोकांचे ब.मो.पुरंदरे यांच्यासोबत अनेक फोटो त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरती आहेत. या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून रायगडाचे पावित्र्य जपा नविन वाद महाराष्ट्रात उत्पन्न करू नका असं म्हटलंय
जागल्याभारत च्या व्यंगचित्रावर दैनिक सकाळ मधिल बातमीवर खुलासा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 08, 2021 14 :00 PM
WebTitle – A form of book worship with human ashes in front of Shiva Samadhi? Both in custody