Jai Bhim Movie Saravanan Sivakumar Suriya movie जयभीम चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने अनेक विक्रम केले,सर्वाधिक कमाईसोबतच ऑस्कर अकादमी च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने (Oscar youtube channel) चित्रपटाची दखल घेतली होती.यासोबतच हा चित्रपट चीनमध्येही प्रचंड लोकप्रिय ठरला होता.एकीकडे चित्रपटाने अनेक विक्रम केलेले असताना दुसरीकडे भारतात त्यांच्यावर काही आरोप आणि तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या. हे प्रकरण आताही थांबण्याचे नाव घेत नसून आता या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कॉपीराइट कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
काय आहे तक्रार?
व्ही कुलंजियाप्पन नावाच्या एका व्यक्तीने जयभीम चित्रपटाची कथा आपली असल्याचा दावा केला आहे.आणि आपल्याला वचन दिल्याप्रमाणे निर्मात्यांनी आपल्याला चित्रपटाची रॉयल्टी दिली नसल्याचा आरोप करत जयभीम चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याविरोधात व्ही कुलंजियाप्पन यांनी कॉपीराईट कायद्यांतर्गत (Jai Bhim Movie FIR under the copyright act)तक्रार दाखल केली आहे.
50 लाखाचा दावा
व्ही कुलंजियाप्पन यांनी दावा केला आहे की त्यांना निर्मात्यांनी 50 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. मात्र त्यांना हे पैसे आजवर मिळालेले नाहीत.आपल्या कथेचा चित्रपटात वापर केला गेला मात्र रॉयल्टी दिली गेली नाही,यामुळे व्ही कुलंजियाप्पन यांनी तक्रार दाखल केलीय.व्ही कुलंजियाप्पन यांनी असंही म्हटलंय की चित्रपटात त्यांच्या समाजाचे चुकीचे चित्रीकरण केले गेले आहे.
Jai Bhim Movie हा चित्रपट एका आदिवासी जोडप्याच्या कथेवर आधारित
अनेकदा असं म्हटलं जातं की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. बहुतांश चित्रपटांमध्ये समाजातील कटू वास्तवाची जाणीव लोकांना करून दिली जाते. तमिळ भाषेत बनलेल्या जय भीम चित्रपटाची कथाही अशीच आहे. जय भीम हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट असून यामध्ये आदिवासींवरील अत्याचार चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहेत. भारतातील लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले, पण आता जयभीम चित्रपटाचे चीन मध्येही या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे.
TJ ज्ञानवेल दिग्दर्शित या चित्रपटात सुर्या, के. मणिकंदन, लिजोमोल जोस आणि प्रकाश राज यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
चित्रपटाची कथा एका वकिलाच्या जीवनावर आधारित आहे जो आदिवासी लोकांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतो आणि जिंकतो.
पोलीस स्वतःच्या फायद्यासाठी निष्पाप आणि गरीब लोकांच्या जिवाशी कसे खेळतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
Jai Bhim Movie जय भीम पिक्चर कुठे पाहता येईल?
जय भीम पिक्चर तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकाल. Amazon Prime Video हे एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 27,2022, 10:55 AM
WebTitle – A case has been filed against the makers of Jai Bhim Movie