बुद्ध ही बुद्ध है भारतात कुठेही खोदकाम केले की बुद्ध धम्माशी संबंधित अवशेष साहित्य शिल्प मूर्ती सापडतात,जगातही कुठे कुठे अशा गोष्टी सापडून येत आहेत. यांग्त्झी किंवा यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईल व अॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे.यांग्त्झी किंवा यांगत्से नदी च्या (Yangtze River) पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे चीनच्या नैऋत्य शहर चोंगकिंग (Chongqing) येथील एक बुडलेले बेट आणि अखंड पाषाणात कोरलेल्या तीन बुद्ध मूर्ती शिल्प उघड झाली आहेत.(Yangtze River a trio of Buddhist statues) या मूर्ती 600 वर्ष जुन्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
यांग्त्झी (यांगत्से) नदी मधिल एका मूर्तीवर बुद्ध कमळावर बसलेले
ही तिन्ही शिल्पे बेटाच्या फोयेलियांग (Foyeliang) नावाच्या खडकाच्या शिखरावर सापडली आहेत. हे मिंग आणि किंग राजघराण्याच्या काळात बांधले गेले असावेत असे सांगितले जात आहे. यातील एका मूर्तीवर बुद्ध कमळावर बसलेले दिसतात.
यांगत्झी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे
चीनच्या नैऋत्य भागात दुष्काळ आणि झपाट्याने घसरणाऱ्या तापमानामुळे यांगत्झी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की यांगत्झी खोऱ्यात जुलैपासून सरासरीपेक्षा सुमारे 45% कमी पाऊस झाला आहे.त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.हे उच्च तापमान किमान आणखी एक आठवडा टिकू शकते.
आणखी सांगायचं म्हणजे अलिकडे चोंगकिंगमध्ये 34 काऊन्टीमधील सुमारे 66 नद्या कोरड्या पडल्या आहेत
युरोपातही अशीच परिस्थिती आहे. युरोपातही सध्या तीव्र दुष्काळ आहे.
अशा परिस्थितीत अनेक दिवसांपासून पाण्यात बुडलेल्या गोष्टी तिथल्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून बाहेर पडत आहेत.
दुसरीकडे,स्पेनमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना ‘स्पॅनिश स्टोनहेंज’ नावाचे प्रागैतिहासिक दगडांचे वर्तुळ सापडले आहे. त्याचबरोबर महायुद्धाच्या काळातील दोन बॉम्बही सापडले आहेत. हे दोन्ही बॉम्ब 450 किलोचे होते, जे लष्कराच्या मदतीने निकामी करण्यात आले. अनेक महायुद्धांमध्ये पाण्यात हरवलेल्या युद्धनौकाही नदी कोरड्या पडल्याने बाहेर पडल्या आहेत. दुष्काळाने पुरातन काळातील अनेक दफन रहस्ये उघड केली आहेत.
पा रंजित च्या धम्मम च्या निमित्ताने : इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप
धुळे येथे बौद्ध समाजावर मनुवाद्यांनी टाकला बहिष्कार,पाणी,दूध,किराणा,बंद
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 31,2022, 16:25 PM
WebTitle – A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River