दिल्ली/मुंबई : काश्मिरी पंडितांच्या पलायन या विषयावरील ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापले आहे. एकीकडे भाजपशासित राज्यांमध्ये भाजप हा चित्रपट करमुक्त करत आहे, तर दुसरीकडे विरोधक या चित्रपटावरून होणाऱ्या राजकारण आणि ध्रुवीकरणाला विरोध करत आहेत.विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाच्या नावावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भाजप काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा ‘खोटा प्रचार’ करत असून देशात ‘विषारी वातावरण’ निर्माण करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
द काश्मिर फाईल्स चित्रपटा च्या स्क्रिनिंगला परवानगी देण्याची गरज नव्हती
‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाबद्दल शरद पवार म्हणाले, ‘द काश्मिर फाईल्स चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, काश्मिरी पंडितांच्या समस्या दूर करण्याऐवजी त्यातून राजकीय फायदा मिळवणाऱ्या आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करणाऱ्या लोकांशी युवाशक्तीच सत्य आणि एकतेच्या बळावर मुकाबला करू शकते. देशातील परिस्थिती सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढताना देखील दिसतोय.प्रधानमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र प्रधानमंत्री म्हणतात चित्रपट चांगला आहे.’
मुस्लिमांनाही लक्ष्य करण्यात आले
शरद पवार म्हणाले की, 1990 मध्ये काश्मिरी पंडितांना खोरे सोडावे लागले हे खरे आहे, मात्र त्यावेळी मुस्लिमांनाही लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या हल्ल्यांना पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
नेहरूंच्या मुद्यावरून भाजपवर टीका
जवाहरलाल नेहरूंचे नाव या वादात ओढल्याबद्दल पवारांनी भाजपवरही टीका केली. त्यानंतर ते म्हणाले की स्थलांतर झाले तेव्हा व्हीपी सिंग प्रधानमंत्री होते आणि जगमोहन राज्यपाल होते. त्यांनी तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्यावर ठपका ठेवला ज्यांनी काश्मिरी पंडितांना खोर्यातून बाहेर काढण्याची सोय केली.”व्हीपी सिंग सरकारला भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद हे गृहमंत्री होते आणि जगमोहन, ज्यांनी नंतर दिल्लीतून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते,”जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जगमोहन यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिला होता.”असेही ते म्हणाले.
द काश्मीर फाईल्स
1990 साली काश्मीर खोर्यातील काश्मिरी पंडितांचे स्थलांतर आणि हत्याकांड याभोवती चित्रपटाची कथा फिरते. यात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,दर्शन कुमार आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कश्मीर फाईल्सच्या विवेक अग्निहोत्रीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांची विमान प्रवासादरम्यान भेट झाली.त्यावेळी त्यांनी चित्रपटासाठी अभिनंदन केले होते. या प्रवासादरम्यान मी पवारांच्या पाया पडलो, यावेळी पवारांनी चित्रपटाला आशीर्वाद देखील दिले होते.त्यावेळी दोघांनी मला व माझ्या पत्नी पल्लवी जोशीला शुभेच्छा दिल्या होत्या. मीडियासमोर पवारांना काय झाले माहिती नाही, पण त्यांचा ढोंगीपणा उघडपणे दिसत असला तरी मी त्यांचा आदर करतो, असे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.
विवेक अग्निहोत्री ने असेही म्हटलंय की, “भारतासारख्या गरीब देशात, तुमच्या मते, एखाद्या राजकारण्याने जास्तीत जास्त संपत्ती कमावायला हवी ?”
“भारतात इतकी गरिबी का आहे, हे तुमच्यापेक्षा चांगले कोणाला माहीत आहे? देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि सद्बुद्धी देवो.”
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 01, 2022 20:26 PM
WebTitle – The Kashmir Files: BJP is spoiling the atmosphere of the country: Sharad Pawar