RRR Box office collection राजामौली यांच्या चित्रपटासाठी जशी अपेक्षा केली जात होती त्या अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी त्यापेक्षा जास्त छप्परफाड कमाई केल्याचे पाहायला मिळाले. यूकेमध्ये या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 2.40 कोटी रुपये होते. राजामौली यांच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व ठिकाणचे कलेक्शन एकत्र करून 200 कोटींचा टप्पाही ओलांडण्यात यश मिळवले.
RRR Box office collection बॉक्स ऑफिसवर RRR चा जलवा
बाहुबलीनंतर एसएस राजामौलीचा आरआरआर लोकांची मने जिंकताना दिसत आहे. सिनेमा हॉलमधून बाहेर पडणारे लोक चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत. याच कारणामुळे हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात बंपर कमाई करताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, RRR ने भारतात पहिल्या दिवशी 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या रिपोर्टनुसार, अमेरिका, कॅनडा आणि यूएसए सारख्या देशांमध्येही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.
द काश्मिर फाईल्स चा मोडला रेकॉर्ड
RRR चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याचा परिणाम द काश्मिर फाईल्स चित्रपटावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.स्क्रीन आणि शो कमी केल्यामुळे The Kashmir Files ची कमाई प्रभावित झाली आहे.चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात ,शुक्रवार,शनि आणि रविवार मिळून .. [आठवडा 3] केवळ 4.50 कोटीचा व्यवसाय केला,आतापर्यंत हा चित्रपट एकूण: ₹ 211.83 कोटी एवढा व्यवसाय करू शकला.हा आकडा RRR चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शन पेक्षाही कमी आहे.द काश्मीर फाईल्स चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹ 3.55 cr एवढा व्यवसाय केला होता.
तगडी स्टारकास्ट
ज्युनियर एनटीआर आणि राम चरण दोघेही साऊथचे सुपरस्टार आहेत. याशिवाय राजामौली हे त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. रमेश बाला यांच्या ट्विटनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडत साऊथमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दक्षिणेव्यतिरिक्त RRR ने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही चांगला व्यवसाय केला आहे.
200 कोटींचा टप्पा पार केला
RRR Box office collection राजामौली यांच्या चित्रपटासाठी जशी अपेक्षा केली जात होती त्या अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी त्यापेक्षा जास्त छप्परफाड कमाई केल्याचे पाहायला मिळाले.यूकेमध्ये चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 2.40 कोटी रुपये होते. आंध्र बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, बाहुबलीनंतर पहिल्याच दिवशी राजामौलीचा RRR 200 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आगामी काळात काय करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
RRR चित्रपट कलेक्शन
या चित्रपटाने (तामिळ) टॉलीवूडच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार, याने पहिल्याच दिवशी तेलुगुमध्ये “रु. 120 कोटी” नेट प्लस जमा केले. इतर विविध प्रदेशांमधून इतर भाषिक आवृत्त्यांनी खालील आकडे नोंदवले आहेत.
Tamil = Rs 10 crore
Hindi = Rs 25 crore
Kannada = Rs 14 crores
Malayalam = Rs 4 crores
ऑस्ट्रेलिया – A$702,480
न्यूझीलंड – NZ$69,741
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांना विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 26, 2022 11 : 59 AM
WebTitle – RRR Box office collection day 1