मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पार्टीवर जोरदार घणाघात केला. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदार आणि जिल्हाप्रमुख पदाधिकारी याना ऑनलाईन पध्द्तीने संबोधित केलं. यावेळी काश्मीर फाईल्स चित्रपटाचा मुद्दा सुद्धा चर्चेत आला,त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.भाजपला आपल्या बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.यावेळी त्यांनी काश्मीर फाईल्स वरून केल्या जाणाऱ्या राजकारणावर भाजपवर बोचरी टीका केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत “या गोष्टी गावागावात जाऊन लोकांना सांगा असे आदेश सुद्धा दिले आहेत.यांचा भीतीचा बागुलबुवा तळागाळात जाऊन आपल्या माता भगिनींच्या बांधवांच्या मनातून काढून टाकून ह्यांचे हिंदुत्व कसे थोतांड आहे हे फार गरजेचं आहे.” असेही त्यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बाधंवांनो भगिनींनो मातांनो बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत,तुम्हाला सर्वांना कल्पना आहे.एकामागोमाग एक अशा काहीना काही घटना घडत आहेत,त्यामुळे मला एकाच जागी बसावं लागत आहे. आजची ही बैठक फार महत्वाची आहे.
“सत्ता आल्यानंतर आणि मधला काळ जो कोरोना चा काळ गेल्यानंतर निखाऱ्यावर जमलेली जी राख आहे तिच्यावर फुंकर मारण्याची गरज आहे. शिवसेना आणि शिवसैनिक म्हटल्यानंतर धगधगता निखारा ही जी काही आपली ओळख आहे,त्या ओळखीवर थोडीशी राख जमली असेल तर ती राख झटकून टाकणं, तिला फुंकर मारून त्याची धग विरोधकांना दाखवण्याची गरज आहे,” “आणि हाच आपल्या शिवसंपर्क मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
“पक्ष वाढवणे हा महत्वाचा मुद्दा आहे,शिवसेना प्रमुखांचे वैशिष्ट्य होतं की कितीही वर्षे गेली तरी तरुण वर्ग हा त्यांचा चाहता राहिला आहे.तरुण वर्ग हा आतापर्यन्त राजकारणच नाहीतर इतिहास घडवत आला आहे.नव्या चेहऱ्यांची यादी,आपण एकदा तरी जिंकलेल्या मतदार संघाची यादी,आपल्याकडे असणं गरजेचं आहे.”
“जे मतदार संघ परंपरागत भारतीय जनता पक्षाकडे होते आणि आहेत,तिथे आपला माणूस उभा का राहत नाही? आपल्याकडून महिला कार्यकर्त्या का उभ्या राहात नाही? त्यांना शोधा,ते समोरच असतात,काही वेळेस आपलं दुर्लक्ष होतं.मला पुढच्या वेळेस त्या मतदार संघात जिंकू शकण्याची क्षमता असणारा उमेदवार पाहिजे.”
“आपण लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर कोणत्याही निवडणुका फारशा गांभीर्याने घेत नाही. लढत नाही. पण आता तसं करुन चालणार नाही. भाजपाचं एक स्वप्न आहे पंचायत ते पार्लमेंट म्हणजे त्यांना सत्तेच्या ठिकाणी दुसरं कोणी असताच कामा नये या त्यांच्या धोरणाला रोखलं पाहिजे. पंचायत ते पार्लमेंट म्हणजे आपल्याच अंगठ्याखाली आपल्याच बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. आणि ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे. हे आपलं हिंदुत्व नव्हतं,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आम्ही भाजपाला सोडलं आहे,हिंदुत्वाला नाही.
“मी दसरा मेळाव्यात म्हणालो होतो,आमचं राजकारण हिंदुत्वासाठी आहे..आमचं राजकारण हिंदुत्वासाठी हे राजकारणासाठी हिंदुत्व घेत आहेत. आपण राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करत नाही हा मुख्य फरक आहे.” असंही ते म्हणाले.
“मी अयोध्येला गेल्यावर मला प्रश्न विचारण्यात आला तेव्हाही मी म्हणाले,आम्ही भाजपाला सोडलं आहे, हिंदुत्वाला नाही. सत्ता असो किंवा नसो आम्हाला पर्वा नाही.आम्ही हिंदुत्व सोडणार नाही.. “विरोधकांची स्ट्रॅटेजी ओळखा. भाजपाकडे आपण काय केलं हे सांगण्यासारखं नाही, म्हणून ते दुसऱ्यांवर टीका करतात.दुसरा कसा देशद्रोही आहे.आणि आम्ही कसे गंगेने गंगा स्नान करून पवित्र झालो आहोत.आता गंगा स्नान म्हटल्यावर त्यावेळी कोरोनाच्या काळात किती शव किती मृतदेह त्या गंगेच्या पाण्यात फेकून दिले हे त्यांनी तरी मोजले कि नाही हा प्रश्नच आहे. उत्तर प्रदेशात त्यांनी दैदीप्यमान विजय मिळवला असं काही नाही. समाजवादी पक्षाच्या जागाही वाढल्या आहेत. एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि संमोहीत करत आहेत. वस्तुस्थितीचा विचार करणार नाही अशा पद्धतीची एक अनामिक भीती दाखवने सुरु आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पूर्वी इस्लाम खतरे में,आता हिंदू खतरे में
“पूर्वी इस्लाम खतरे में असायचा,आता हिंदुत्व खतरे में है ही एक नवीन बांग भाजपने सुरु केली आहे.म्हणजे प्रत्येक वेळेला एक अनामिक भीती दाखवायची,बघा तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर अमुक होईल.असं नाही केलं तर तसं होईल,आणि मग त्याच्यामध्ये गेल्या पाच वर्षात उत्तरप्रदेशात ज्या घटना घडल्या खरतर दुर्घटना,म्हणजे सुरुवातच जी झाली होती.जवळपास सत्तर एक बालकं,त्यांचा ऑक्सिजन अभावी तडफडून तडफडून त्यांचा अंत झाला होता.वाहून गेलं हे गंगेमध्ये.कोरोनाच्या वेळेला मृतदेह गंगेत सोडले,तेही वाहून गेलं.त्याच्यानंतर उन्नाव असेल हाथरस असेल शेतकरी चिरडले असतील,शेतकऱ्यांच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेले शेतकरी असतील.सगळं काही वाहून गेलं.पण..”
पुन्हा एकदा इतिहासाच्या खपल्या काढल्या जात आहेत
पुन्हा एकदा इतिहासाच्या खपल्या काढल्या जात आहेत,हा जो त्यांचा एक डाव आहे.तो आपल्याला मोडून काढला पाहिजे.
आणि आता आपल्याला ते हिंदू विरोधी म्हणजे शिवसेनेला देखील इतर काही सेने अशी नावं दयायला सुरुवात केली आहे.जनाब म्हटलं जातंय.
मग मीही काही उदाहरणे देतो.ही उदाहरणे मी का देतोय तर…तुम्ही हि उदाहरणे गावागावात जाऊन सांगितली पाहिजेत.
आता डाव पहा…काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. काय संबंध आहे का?
आम्ही कधी दुरान्वये सुद्धा यांच्या बाजूला येऊ शकतो का? हाच खऱा डाव आहे.
एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा.
औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही एवढी आमची कडवट निष्ठा असताना
उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं आम्ही काय मूर्ख नाही.
आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं कदापि शक्य नाही,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
“ज्याप्रमाणे अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीबरोबर मांडीला मांडी लावून सत्तेसाठी मांडीघाशी केली,
तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही.
सत्ता मिळत असली तरी एमआयएम बरोबर आम्ही जाणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मोहन भागवत च्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का?
“शिवसेना आता मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. मी मोहन भागवत यांची काही वाक्यं घेऊन बसलो आहेत
जर मला जनाब म्हणणार असाल तर ही वक्तव्य तुमच्या आरएसएसच्या प्रमुखांनी केलेली आहेत त्यांना तुम्ही काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. अब्दुल कलाम याना शिवसेनेने पाठींबा दिला होता,नाव कुणी सुचवलं होतं? तुमच्याकडे असलेले मुसलमान हे सगळे गंगा जलाने अंघोळ केलेली लोकं आहेत.आणि आमच्याकडे तर आम्ही काय तसे लांगुलचालन केलेलं नाही.
तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणुन आम्ही मुस्लीमधार्जिणी असू जे आम्ही कदापि नाही आहोत,
तर मोहन भागवतांनी काय सांगितलं आहे ते ऐका असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांची काही वक्तव्यं वाचून दाखवली.
तसंच आरएसएसला मुस्लीम संघ की राष्ट्रीय मुस्लीम म्हणायचं का?” असंही त्यांनी विचारलं.
“हे पहिलं आपल्याला सावरकरांवरुन आपल्याला शिकवतात.भगवताने लिहिलेलं आहे.सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते.त्यांनी उर्दूत गझल लिहिलेली आहे.- मोहन भागवत, हे माझ्याकडे कात्रण आहे.संघ आता मुस्लिम वस्त्यांमध्ये शाखा उघडणार आहे.हे कोण आहेत? या मुसलमानांचं काय करायचं? आणि पुन्हा आर एस एस ला काय म्हणायचं? मुस्लिम संघ म्हणायचं ? मुसलमान संघ म्हणायचं ? राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं ? मोहन भागवताना खान वगैरे म्हणायचं? पण त्यांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत आणि आपले काही वेळेला मिळते जुळते आहेत.पण तुम्ही आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आम्हाला विरोध करणारे देशद्रोही हा जो काही कांगावा चालू आहे तो फार वाईट आहे.”
मेहबूबा मुफ्ती सोबत सत्ता भोगली
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या हम नहीं चाहते थे अफजल गुरु को फांसी ,अब परिजनो को सोंपा जाए उसका शव ,
यानंतर तुमची त्यांच्यासोबत युती झाली आहे,आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली म्हणून राज्यावर आभाळ कोसळलं नाही.
ते तुमच्यावर कोसळलं आहे.
आम्ही जर एखादी गोष्ट केली तर ती वाईट आणि तुम्ही केली तर तो एक आदर्श नमुना? तरी देखील तुम्ही देशप्रेमी?
दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड
“हम कहते हैं कि हमारा हिंदू राष्ट्र है. हिंदू राष्ट्र है इसका मतलब इसमें मुसलमान नहीं चाहिए, ऐसा बिल्कुल नहीं है. जिस दिन ये आ जाएगा कि यहां मुस्लिम नहीं चाहिए, उस दिन वो हिंदुत्व नहीं रहेगा.’ हा माझाकडे व्हिडीओ आहे.हे कोण म्हणाले ? उद्धव ठाकरे नाही म्हणाले, हे मोहन भागवत म्हणाले आहेत.आहे का ? भारतीय जनता पक्षाकडे मोदी असतील अमित शाह असतील आणि आपल्याकडे जे चिटूर पिटूर जे बकबक करतात ना..ज्यांच्या तोंडातून शब्दांच्या ऐवजी गटारगंगा वाहते.असे त्यांचे चेलेचपाटे अन दलाल प्रवक्ते ते याच्यावर उत्तर देऊ शकतील का?
“किती बोंबाबोंब करायची? पण ह्या गोष्टीकडे मी तुमचे खास लक्ष वेधू ईच्छितो की
एक भ्रम निर्माण करायचा की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं,अजिबात नाही.
पहिलं जर सोडणार म्हणत असाल तर अगोदर याच्यावर उत्तर द्या.आणि मग आमच्यावर आरोप करा.
मला वाटतं एक दिवस कदाचित हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असंही म्हणायला कमी करणार आहे.
हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असंही म्हणतील पण तो त्यांचा मानसिक आजार असेल. बाकी दुसरं काही नाही,
पण इथपर्यंत त्यांची मजल गेली आहे.आपला तो बाब्या आणि दुसरा तो गुंड” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड हा प्रकारही लोकांच्या नजरेत आणला पाहिजे.
यांचे नुसते जबाब घेतले तरी यांची तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात,”
असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
(काश्मीर फाईल्स) आता एक नवीन फाईल उघडली – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले ” आता एक नवीन फाईल (काश्मीर फाईल्स) उघडली गेलीय चित्रपटाच्या माध्यमातून, तो सगळा काळ आठवा ज्यावेळेला काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याच्याआधी जे आपल्या देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाले मग हिंदूंवर झाले. त्यावेळी जगमोहन हे तेव्हा काश्मीर चे गव्हर्नर होते..त्यावेळी त्यांनी हिंदू पंडितांना निघून जाण्यास सांगितलं.आणि त्यांना निघून जाण्यास मदत केली.असं तेही एक काम आहे.तेव्हा त्यांना ते सुरक्षित ठेवण्यासाठी असेल.पण सरकार कुणाचं होतं? भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं.
काश्मीर फाईल्स वरून केल्या जाणाऱ्या राजकारणावर भाजपवर बोचरी टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले “व्ही.पी.सिंग याना आपण विरोध केला होता.वि.पी. सिंग प्रधानमंत्री झाल्यावर कोणत्याही मंदिरात गेले नाहीत,तर दिल्लीच्या जामा मशिदीत जाऊन इमाम बुखारीला भेटले..भारतीय जनता पक्षाने एक अवाक्षर काढलं नव्हतं.ना त्यांचा पाठींबा काढला होता.काश्मीर मध्ये अत्याचार सुरु होते.भारतीय जनता पक्षाने त्याच्याबद्दल त्याहीवेळेस त्याबद्दल एक अवाक्षरही काढलं नव्हतं..एकच आवाज जो कोणी त्यावेळी गर्जना केली होती ती हिंदू दृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी केली होती,बाकी कुणी मायचा पूत,तो आज कितीही अश्रू ढाळत असला तरी त्याच्याविरुद्ध ब्र काढण्याची त्याची हिंमत नव्हती.आणि काढलाही नव्हता.हे सत्य आहे.
हे सत्य मांडायचं असेल तर सर्व सत्य जनतेसमोर आणलं पाहिजे.पण पिढी बदलल्यानंतर आम्ही काहीतरी नविन इतिहास घडवला म्हणून दंड थोपटत आहेत,त्यांची नावे सुद्धा काश्मिरी जनतेला माहित नाहीत. मग हे सत्य का नाही लोकांसमोर आणत.” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
भीतीचा बागुलबुवा
“अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. अतिरेक्यांना तेव्हा अंगावर घेणारे एकच मर्द शिवसेनाप्रमुख होते ,दुसरं कोणीही नव्हतं,इतिहास तोडून मोडून आम्हीच तुमचे तारणहार आहोत,आणि जर आम्हाला मत नाही दिलं तर तुमचं काय होणार? हा जो काही भीतीचा बागुलबुवा दाखवला जातोय ऱ्यांना मार्गदर्शन करत “या गोष्टी गावागावात जाऊन लोकांना सांगा असे आदेश सुद्धा दिले आहेत.यांचा भीतीचा बागुलबुवा तळागाळात जाऊन आपल्या माता भगिनींच्या बांधवांच्या मनातून काढून टाकून ह्यांचे हिंदुत्व कसे थोतांड आहे हे सांगणे फार गरजेचं आहे.” असेही त्यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 20, 2022 19 : 15 PM
WebTitle – Kashmir Files: No one shed a tear that time – Uddhav Thackeray