जागल्याभारत वर आम्ही जे व्यंगचित्र केलं ते अपेक्षेप्रमाणे व्हायरल झालं.काल राष्ट्रीय जनता दल चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी ते शेअर केलं त्यानंतर आज महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही शेअर केलं आहे.या व्यंगचित्रावर आज दैनिक सकाळ वृत्त समूहाने बातमी केली आहे.परंतु बातमीत वर्णन करताना असे म्हणले आहे की त्यांनी एक खास व्यंगचित्र शेअर केलं आहे ते कुणावर निशाणा साधत आहे का? आणि त्यामुळे समीर वानखेडे यांच्याबद्दल काही लिंक आहे का? असा एक प्रश्न तिथं निर्माण केला गेला आहे.त्याबद्दलचा हा खुलासा –
नवाब मलिक यांनी हे व्यंगचित्र फेसबुक आणि ट्विटर असे दोन्हीकडे शेअर केले आहे. लालू प्रसाद यादव यांनीही हे व्यंगचित्र दोन्हीकडे शेअर केले आहे.
जागल्याभारत च्या व्यंगचित्रावर दैनिक सकाळ मधिल बातमीवर खुलासा
हे चित्र आम्ही मागील वर्षी बनवलं आहे.आमचे कलाकार दिनेश मोरे यांनी यावर खूप मेहनत घेतली आहे.अनेक चर्चा आणि बदल करून शेवटी त्याला मूर्त स्वरूप मिळालं.आम्ही चित्र करताना एक लक्षात ठेवलं आहे की आंबेडकरी चळवळ आणि अनुषंगाने येणाऱ्या प्रतिमा प्रतीके हे नव्या ढंगात नव्या कॉन्सेप्ट ने लोकांसमोर आणायचं आहे.आणि विशेष बाब म्हणजे हे व्यंगचित्र आम्ही 14 एप्रिल 2021डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निर्मित केले होते.
दैनिक सकाळ ने म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट योग्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या माध्यमातून धर्मवाद,मनुवाद,जातीयवाद, असमानता,वर्गवाद या मुद्यांशी लढत आहेत,खरतर ते केवळ लढत नसून त्यांनी हे सगळंच संविधान निर्माण करून थोपवून धरलं आहे.आणि जोपर्यंत संविधानाची ढाल आहे,तोपर्यंत या गोष्टी इथल्या नागरिकांना त्रास देणार नाहीत.थोडक्यात या सर्व विषमतावादी गोष्टींपासून केवळ बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधनाच वाचवणार आहे संरक्षण देणार आहे.हा या कॉन्सेप्टचा मुळ विचार आहे.
हे स्पष्टीकरण यासाठी की याचा अलिकडे सुरू झालेल्या ड्रग्ज प्रकरण,जयभीम सिनेमा,किंवा मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अशा कोणत्याही घटकांचा,किंवा वादाचा मुद्दा,संदर्भ याचा काहीही संबंध नाही.
आमची चित्रे आमचं काम लोकांना आवडत आहे ही गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना..आत्मशोध घेताना..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 07, 2021 11 :00 AM
WebTitle – clarification on Daily Sakal News of Jaglyabharat’s cartoon