जय भीम चित्रपटाचा अभिनेता सूर्या आणि ज्योतिकाच्या होम प्रोडक्शन बॅनर 2D एंटरटेनमेंटने सोमवार, 14 नोव्हेंबर रोजी घोषणा केली की, पार्वती अम्मल यांच्या नावावर 10 लाख रुपयांची मुदत ठेव उघडली जाणार आहे, पार्वती अम्मल यांच्या जीवनकथेवर आधारित जयभीम हा सिनेमा आधारलेला आहे. पार्वती अम्मल यांनी त्यांचे पती राजकन्नू यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यावर त्यांच्या न्यायासाठी यशस्वी लढा दिला.
या दहा लाख रकमेची फिक्स डिपॉझिट करण्यात येणार असून त्यातून महिन्याकाठी मिळणारे व्याज पार्वती अम्मल यांना मिळणार आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात ही रक्कम त्यांच्या मुलांना दिली जाईल.असे अभिनेता सूर्या यांनी स्पष्ट केले.
चित्रपट रिलीज होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी1कोटी रुपये
के. चंद्रू यांनी 31 जुलै 2006 ते 8 मार्च 2013 पर्यंत मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले. त्यांच्या सात वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी 96,000 हून अधिक प्रकरणे निकाली काढली. यापैकी, 1,500 हून अधिक प्रकरणांचे निकाल कायद्याच्या जर्नल्समध्ये नोंदवले गेले.त्यामधीलच पार्वती अम्मल यांच्या पतीची एक केस होती ज्यावर हा जयभीम सिनेमा आधारित आहे.
टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित जय भीम चित्रपट, सध्या सोशल मिडियात चर्चेचा विषय बनला आहे.अनेकांना हा चित्रपट पसंतीस उतरला आहे. सुरिया, लिजोमोल जोस आणि मणिकंदन हे कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत. 2 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सर्वच स्तरातून चांगली ओपनिंग मिळाली.सत्य घटनेवर आधारित या सिनेमाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक होतंय.सोशल मिडियात हा सिनेमा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.
विशेष म्हणजे,चित्रपट रिलीज होण्यापूर्वी, सुर्याने इरुलर विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी
तामिळनाडू सरकारला 1 कोटी रुपये दान केले.
इरुला विशेषत: असुरक्षित आदिवासी गट (PVTG) म्हणून वर्गीकृत आहेत.
ही रक्कम इरुलर विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी काम करणाऱ्या
पझनकुडी इरुलर एज्युकेशनल ट्रस्टला दान करण्यात आली.
हा धनादेश 1 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16, 2021 19:44 PM
WebTitle – Surya donated Rs 10 lakh to Parvati Ammal, the original inspiration of Jayabhim