मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते. न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते. धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘पैगंबर मोहम्मद बिल’ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अधिवेशनात ते बिल मांडण्यात आले होते.येणाऱ्या अधिवेशनात पैगंबर मोहम्मद बिल मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
शासन मुस्लिम समाजाच्या प्रश्नाबाबतीत गंभीर नाही. शासनाच्या याच वृत्तीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5 जुलै 2021 रोजी विधान भवनावर मोर्चा काढुन उपरोक्त मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पहोचवन्यात आले होते तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून जनजागृती अभियान चालवण्यात आले तरी ही शासनातील तिन्ही पक्ष या मागणीकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहेत परंतु वंचित बहुजन आघाडी मुस्लिम प्रश्नांबाबत गंभीर असुन सोमवार 22 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणां विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे आहेत-
- न्यायालयाने मान्यता दिलेले 5 % मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
- धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘पैगंबर मोहम्मद बिल’ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
- महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
- संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
- वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
- सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.
या व अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात सोमवार 22 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. सज्जाद मापारी आणि अबुल हसन खान यांची उपस्थिती होती.
राज्य माफियांच्या हाती,अनिल देशमुखांनी माफीचा साक्षिदार व्हावं-प्रकाश आंबेडकर
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 11, 2021 16: 44 PM
WebTitle – Vanchit Bahujan Aghadi agitate for Prophet Muhammad Bill and Muslim reservation