जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. 29 ऑक्टोबर रोजी महिला अभ्यास केंद्राने येथे वेबिनारचे आयोजन केले होते. काश्मीरवर आधारित या कार्यक्रमात काश्मीरला ‘Indian occupation in Kashmir’ असे संबोधण्यात आल्याने वाद झाला. या कार्यक्रमाला अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला.
याची माहिती जेएनयू प्रशासनाला कळताच क्षणाचाही विलंब न करता हा वेबिनार सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला.
त्याची चौकशी करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
त्याचबरोबर याप्रकरणी आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी अभाविप करत आहे.
त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात जेएनयूएसयू आणि डाव्या समर्थकांकडून रात्री निदर्शने
याशिवाय त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात जेएनयूएसयू आणि डाव्या समर्थक विद्यार्थ्यांकडून रात्री निदर्शने करण्यात आली. त्रिपुरातील मुस्लीम समाजातील लोकांवर तेथील सरकार आणि अनेक संस्थांकडून अत्याचार होत असल्याचा आरोप डाव्या विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी जुन्या पद्धतीने म्हणजे गंगा ढाब्यावरून डफलीसोबत घोषणाबाजी करत हा निषेध मोर्चा काढला. जेएनयूएसयूची अध्यक्ष आयसी घोष हीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दुसरीकडे अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
सेंटर फॉर वुमेन्स स्टडीजने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जेएनयूच्या फॅकल्टी मेंबरने विरोध केला होता.
त्याचवेळी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नोटिसीच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला.
नोटीसमध्ये लिहिलेला शब्द देशविरोधी असून केवळ प्रशासकीयच नाही तर
त्यावर कायदेशीर कारवाईही व्हायला हवी, असे अभाविपचे म्हणणे आहे.
जेएनयू प्रशासनाने तत्काळ हा वेबिनार रद्द केला आणि या कार्यक्रमाबाबत
प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची नोटीस जारी केली.
त्यात लिहिलेला ‘ Indian occupation in Kashmir’ हा शब्द अत्यंत आक्षेपार्ह असून
प्रशासन त्याचा निषेध करत आहे असे म्हणत यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 30, 2021 11:33 AM
WebTitle – Controversy over writing ‘Indian occupation in Kashmir’ for JNU webinar