देशातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया च्या विक्रीबाबत म्हणजे तिच्या खाजगीकरणाबाबत गेल्यावर्षापासून चर्चा सुरू होती.आज सकाळपासून एअर इंडिया च्या खरेदीसाठी टाटा समूहाने दाखल केलेलेय निविदेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची चर्चा होती.तशी बातमी ब्लूमबर्गने दिली होती.मात्र, काहीवेळापूर्वीच केंद्रीय निर्गुंतवणूक मंत्रालयाच्या सचिवांनी ट्विटवरुन असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्प्ष्ट केले.
टाटांनीच उभारली होती ही एअरलाईन्स कंपनी
जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्स या हवाई वाहतूक कंपनीची स्थापना केली होती.दरम्यान,काँग्रेस सरकारच्या काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले होते. मात्र, आज 68 वर्षांनंतर ही कंपनी तोट्यात गेल्याचे सांगत विक्रीला काढण्यात आली ती पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मंत्र्यांच्या एका पॅनलने नोटाटांचा प्रस्ताव स्वीकारला, ज्यांनी उद्योजक अजय सिंह यांच्या ऑफरच्या आधी कंपनीच्या बोलीची शिफारस केली, अशी माहिती या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी दिल्याचे ब्लूमबर्गने आपल्या बातमीत म्हटलंय,मात्र निर्णय अद्याप सार्वजनिक केलेला नाही अशीही पुस्ती जोडली आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे, असे सांगण्यात येत आहे.
सरकारचे घुमजाव
वरील माहिती प्रसारमाध्यमात आल्यानंतर केंद्रीय निर्गुंतवणूक मंत्रालयाच्या सचिवांनी
ट्विटवरुन असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्प्ष्ट केले.
अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल,
असे निर्गुंतवणूक मंत्रालयाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले.
त्यामुळे एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.
2007 पासून एअर इंडिया कंपनी तोट्यात
2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,400 देशांतर्गत आणि 1,800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATS ची 50 टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 01, 2021 16:35 PM
WebTitle – Tata wins Air India auction bid airlines