मुंबई, दि. 1 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मध्ये विभागप्रमुख
(योजना-1 विस्तार सेवा-1) – दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण दहा पद भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही पदे राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण दहा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदांची अर्हता, पात्रता, वेतनस्तर, पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या या संदर्भात अधिक माहितीकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे यांचे संकेतस्थळ https://barti.maharashtra.gov.in>NoticeBoard ला भेट द्यावी.
या पदांसाठी अर्ज
महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, 28 क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाऊसजवळ, पुणे 411 001.
या पत्त्यावर 31 जुलै 2021 पर्यंत अर्ज करावेत.
असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 01 , 2021 21 : 00 PM
WebTitle – Recruitment by deputation under Government Service in Barti 2021-07-01