तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दलित समाजातील लोकांच्या धर्मांतरणासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. दलित समाजातील व्यक्तींचं धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असेल त्यासाठी आपण स्वत:ला दोषी ठरवलं पाहिजे कारण आपण त्यांचं संरक्षण करण्यास कमी पडत आहोत, असं मत राव यांनी व्यक्त केलं आहे.
दलितांना जो सन्मान दिला जात नाही तो त्यांना धर्मांतर केल्यावर मिळतो,असंही राव यांनी म्हटलं आहे.
रविवारी कामारेड्डी येथील एका कार्यक्रमादरम्यान भाषण देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“जर दलित सामाजातील लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत असतील तर त्यासाठी
आपण स्वत:ला दोषी ठरवलं पाहिजे. आपण त्यांचं संरक्षण करण्यात कमी पडतो.
जेव्हा हे लोक धर्मांतर करतात तेव्हा त्यांना तो मान दिला जातो जो दलित असल्याने आपण देत नाही.
मी स्वत: हिंदू आहे. मात्र दलितांना आजही गरिबीला तोंड देत अनेक संकटांचा समाना करावा लागतोय,
हे पाहून फार दु:ख होतं,” असं राव यांनी म्हटलं आहे.
If Dalits are converting to Christianity, it's our fault that we're unable to protect them. When they convert to Christianity, they're getting respect denied to them as Dalit. I'm a Hindu & I feel bad when I see that Dalits are still suffering due to poverty: Telangana CM (20.6) pic.twitter.com/BF0CON9aLX
— ANI (@ANI) June 23, 2021
आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन गरीब आणि दलितांना मदत करुन त्यांना या गरिबीमधून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही राव यांनी म्हटलं आहे.
अलीकडेच तेलगणातील कोमटलागुडेम खेड्यातील दलित महिलेचा अडागुडूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाण झाल्यानंतर मृत्यू झाला. ही महिला अडागुडूर येथे एका मोलकरणीची नोकरी करायची. काही दिवसांपूर्वी चोरीचा अहवाल दाखल झाल्यानंतर त्याला 16 जून रोजी मुलगा उदयसह त्याच्या घरी घेऊन गेले होते. आपल्या मुली स्वप्नाच्या वृत्तानुसार, पोलिस कोठडीत महिलेला कठोर मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
कॉंग्रेस पक्षाचे नेते (सीएलपी) नेते मल्लू भट्टी विक्रमारका यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला.
त्यांना आश्चर्याने म्हटले की, “मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना राज्यातील अडागुदूर पोलिस ठाण्यात दलित महिलेची हत्या आणि तिच्या मुलाला बेदम निर्घृणपणे मारहाण केली गेली याची माहिती होती काय?”
धर्मांतराने काय मिळाले आणि काय मिळवले?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 24, 2021 12: 45 PM
WebTitle – “We fail to respect Dalits, so they convert to Christianity” 2021-06-24