मुंबई दि 16 : शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे “फटकारमोर्चा” काढत विरोध प्रदर्शन करण्यात येत होते,मात्र अचानक तेथे शिवसेनेचे कार्यकर्तेही जमले.यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले. भाजपच्या काही कार्यकर्त्याना शिवसैनिकांनी मारहाण केली.यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेवर शिवसेनेचे नेते सदा सरवणकर म्हणाले #सेनाभवन वर कुणी दगड धोंडे घेऊन येत असताना आम्ही गप्प बसणार नाही!!! सेनाभवनाकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहू नये….! #शिवसेनाभवन |
काय आहे प्रकरण ?
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेनेने हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला असल्याचं म्हणत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेविरोधात “फटकारमोर्चा” आयोजित करण्यात आला. यावेळी अचानक तेथे शिवसेनेचे कार्यकर्तेही जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले. भाजपच्या काही कार्यकर्त्याना शिवसैनिकांनी मारहाण केल्याच्या बोलले जात आहे.
या घटनेने चिडलेल्या भाजपा कडून शिवसेनेला रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
राम मंदिर उभारणीची मोहीम बदनाम करण्याचे कारस्थान शिवसेना करते आहे. आज फटकार मोर्चा काढून भारतीय जनता युवा मोर्चाने याचा जाब विचारला. पोलीस बळाचा वापर करून हा मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो, वेळ आली तर शिवसेनेशी रस्त्यावर उतरून संघर्ष करू.
या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमात वायरल होत आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
सेनाभवन आमचं श्रद्धास्थान, डिवचण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळणारच : महापौर
भाजपाकडून माहीम पोलिस स्टेशन मध्ये या राड्या संबंधी तक्रार दाखल करण्यात येत आहे.यावेळी भाजपचे मंगलप्रभात लोढा,आशीष शेलार आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
नवी मुंबई विमानतळ नामांतर राज ठाकरे यांनी सुचवलं दुसरेच नाव
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)