भरदिवसा ब्रीजवरुन नदीत फेकला कोरोना रुग्णाचा मृतदेह.देशात एकीकडे कोरोनाचं संकट सुरूच असताना गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे या मृतदेहांवरुन निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरु असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती कोरोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रापती नदीमध्ये हा भरदिवसा ब्रीजवरुन नदीत फेकला कोरोना रुग्णाचा मृतदेह.पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असून पीडित व्यक्तीची ओळख पटवली आहे. प्रेमनाथ मिश्रा असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते शोहरतगढ येथील सिद्दार्थनगरचे रहिवासी होते.मृतदेह फेकताना बाजूने जाणाऱ्या वाहन चालकाने हे दृश्य पाहिले आणि याचा व्हिडिओ बनवला.
बलरामपूरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रेमनाथ मिश्रा यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान २८ मे रोजी त्यांचं निधन झालं. प्रोटोकॉलचं पालन करत प्रेमनाथ मिश्रा यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह नदीत टाकून दिला”.
बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात नदीत मृतदेह सापडले असल्याने संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे.
पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.अशी माहिती सीएमओ डॉ. वि बी सिंह यांनी दिली आहे.
राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 30, 2021 14 : 40 PM
WebTitle – Corona patient’s body thrown into river from bridge ; Shocking incident captured on camera 2021-05-30