पुणे,दि.29 – सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला जात आहे. मात्र,खासदार संभाजी भोसले यांनी मध्यस्थी करत आणि करोनाच्या परिस्थितीचं गांभार्य सांगत शांतता राखण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं.तसेच त्यानंतर राज्यभर दौरा आणि राजकीय नेत्यांच्या भेटीही ते घेत आहे.आज संभाजीराजे भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आपण संभाजी भोसले यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं.
राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल
खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज एड.प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली.
त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भोसले यांना बहुजन समाजाचं नेतृत्व करण्याचं आवाहनच केलं. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठीचा महत्त्वाचा उपायही सांगितला.
मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजी भोसले यांनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल, असं आंबेडकर म्हणाले.
छत्रपती शाहूमहाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते त्यामुळे एड. प्रकाश आंबेडकर आणि संभाजी छत्रपती का एकत्र होऊ शकत नाहीत? म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत हा या भेटीतील एक दृष्टिकोण आहे,असं वक्तव्य खासदार संभाजी भोसले यांनी यावेळी केले.
डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग – अपेक्षा आणि वास्तव
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 29, 2021 19:11 PM
WebTitle – Adv Prakash ambedkar sambhaji chhatrapati bhosale new political alliance 2021-05-29