भगवान बुद्धांच्या मृत्यू संदर्भात अनेक अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जातात.भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
“हे संपुर्ण जग व त्यातील सर्वच भौतिक व चैतन्यमय वस्तु या सर्व परिवर्तनशील व अनित्य आहेत, अस्थीर व अस्थाई आहेत.”
भगवान बुद्धांनी आम्रपालीला अनित्यवादाचा उपदेश देताना वरील दृष्टिकोण सांगितला.मृत्यू संदर्भात भगवान बुद्धांचा दृष्टिकोण अत्यंत तटस्थ होते.जन्माला आलेला प्रत्येक जीव हा एक दिवस मृत्यू पावणार असून या जगात कुणीही अमर नाही असं त्यांचं मत होतं. मृत्यू हे अंतिम सत्य आहे असं ते म्हणत.
ही गोष्ट त्यावेळची आहे.जेव्हा भगवान बुद्धांचे वय सुमारे 80 वर्षे होतं.आणि अशा काळात माणसाची शारीरिक शक्ती मोठ्याप्रमाणावर क्षीण झालेली असते.या दरम्यान भगवान बुद्ध वैशाली नगरीत होते.तिथं चापाल चैत्य येथे त्यांनी प्रवचन दिले.धम्म उपदेश दिला.हा माघ पौर्णिमेचा दिवस होता.तेथील अंबपाली नामक संस्थानिकास त्यांनी संघात सामील करून घेतले. प्रवज्जा दिली.उपस्थित वज्जीयांना धम्मोपदेश दिला.
यानंतर त्यांनी शिष्य आनंद ला संबोधित करत म्हणतात “हे आनंद माझ्या शरीराची अवस्था वाईट आहे.अनेक व्याधींनी जर्जर झाले आहे.आजपासून तीन महिन्यानंतर तथागतांचा (माझा) आयु संस्कार संपन्न होईल.(म्हणजे परिनिर्वाण.म्हणजेच मृत्यू होणार आहे) भगवान बुद्धांनी आपल्या मृत्यूबद्दल अतिशय सहज सांगितले होते.आणि तो कधी येईल याबद्दलही त्यांना नेमका अंदाज होता.
यावर शिष्य आनंद याने भगवंतांना विचारले “हे भगवंत आता आम्ही काय केले पाहिजे?”
भगवान बुद्ध आनंदास म्हणाले “आपण आता पुढे गेले पाहिजे. इथून निघून आपण पावा नगरी कुशीनारा नगरीकडे प्रस्थान करूया.”
त्याप्रमाणे सर्व भिक्खू संघ कुशीनारा नगरीकडे प्रस्थान करतात.वाटेत अनेक पडाव लागतात.सर्व भिक्खू गण एके ठिकाणी गावात थांबतात.तेव्हा गावातील चुंद लोहार नामक व्यक्तीस भगवान बुद्ध गावात थांबले असल्याचे कळते.चुंद लोहार अगोदरही एकदा भगवान बुद्धांना भेटला होता.आणि त्यांच्या विचार उपदेशाने तो प्रभावित होता.त्याने भगवान बुद्धांना आपल्या घरी थांबण्याची आणि आदरतिथ्य करण्यास अनुमती देण्याची विनंती केली.
भगवान बुद्धांनी ती मान्य केली.चुंद लोहारास खूप आनंद झाला.त्याला काय करू आणि काय नको असे झाले होते,त्याने तथागतांना प्रसन्न वाटेल आनंद होईल असे उच्च दर्जाचे अन्न शिजवले होते.या अन्न पदार्थात एक पदार्थ होता “सूकर मद्दव ” ( Sukara maddava ) हा पदार्थ या राज्यात मिष्ठान्न पदार्थ म्हणून आनंदाच्या क्षणी तयार करण्याची पद्धती होती.हा पदार्थ खीर म्हणून ( Buddha’s last Meal ) प्रसिद्ध आहे.दिघ्घ निकाय खंड || पृष्ठ क्र.127 वर हा उल्लेख आढळून येतो.
हा पदार्थ सेवन केल्यानंतर भगवान बुद्धांची प्रकृती आणखी खालवाली.त्यांना अतिसार झाला.अंगात त्राण उरले नव्हते.अशा अवस्थेत बुद्ध तरीही दु:खी कष्टी नव्हते.त्यांनी पुन्हा कुशीनाराकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली.
“सूकर मद्दव” बाबत काही लोक जाणूनबुझून चुकीची माहिती प्रसारित करत आहेत.सूकर मद्दव हे डुकराचे मांस असल्याची खोटी माहिती प्रसारित करून भगवान बुद्ध आणि बौद्ध धम्म याबद्दल द्वेषयुक्त अपप्रचार करण्याची संधी विरोधक सोडत नाहीत.
सूकर मद्दव नेमकं काय होतं जाणून घ्या..
प्रसिद्ध विचारवंत बौद्धाचार्य शांतीस्वरूप बौद्ध यांच्या म्हणण्यानुसार “सूकर मद्दव” ही एक वनस्पती आहे.मशरूम प्रवर्गातील ही वनस्पती असून चिखलात रताळे बटाटा या कंद वर्गीय प्रमाणे जमिनीखाली ही नैसर्गिकरीत्या उगवते.इथं एक गोष्ट त्यांनी अशी सांगितली की ही वनस्पती डुकरे सुद्धा खातात हाच धागा पकडून ही खोटी माहिती बदनामीसाठी वापरली गेली. शांतीस्वरूप बौद्ध पुढे असं सांगतात की मदर इंडिया चित्रपटात एक सीन आहे,ज्यामध्ये घरातील सर्व अन्न संपलेलं असतं तेव्हा हीच वनस्पती अभिनेत्री नर्गिस शिजवते आणि आपल्या मुलांना खायला घालते.तीच ही “सूकर मद्दव”
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणत्या पदार्थ सेवनाने झाला हा मुद्दा आणखी स्पष्ट करण्यासाठी इथे दोन लिंक देतो आहे.
एक – https://www.speakingtree.in/blog/did-buddha-ate-pork-before-dying
दोन – https://www.facebook.com/watch/?v=715460202454296
पहिल्या लिंकमध्ये या पदार्थाचा उल्लेख वनस्पती म्हणून आला आहे,आणि त्यावेळी ती खीर बनवली गेली असे म्हणले आहे.
तर दुसऱ्या लिंकवर व्हिडिओ आहे.त्यामध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की ही चंदन झाडाच्या आसपास उगवणारी मशरूम वर्गीय वनस्पती आहे.
यावरून हे स्पष्ट होतं की सूकर मद्दव आणि डुकराचे मांस याचा काहीएक संबंध आढळून येत नाही.
यानंतर जे घडलं ते आणखी अद्भुत आहे.
तथागतांची करुणा किती उच्च कोटीची होती याचा प्रत्यय ते शिष्य आनंदाशी शेवटचा संवाद साधतात तेव्हा येतो.
आपल्या पश्चात चुंदाला लोकांनी दोष देऊं नये म्हणून भगवान आनंदाला म्हणाले,
”आपण चुंद च्या घरी जे भोजन ग्रहण केले ते माझे शेवटचे भोजन ठरले.
मात्र लोक त्याला दूषणे देतील लांछन लावतील आणि अयोग्य भोजन दिले म्हणून दूषण देतील.
मात्र , ज्या दिवशीं मला संबोधिज्ञान प्राप्त झालें, त्या दिवशीं मिळालेली व आज मिळालेली
अशा दोन्ही भिक्षा समसमान आहेत, असें तुम्ही चुंदाला सांगा व त्याचें सांत्वन करा.”
बोधिसत्व तथागत भगवान बुद्ध हे जगातील एकमेव असं व्यक्तिमत्व आहे.
ज्याचा जन्म एकाच दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला झाला आणि मृत्यू सुद्धा त्याच दिवशी म्हणजे भगवान बुद्धांचा मृत्यू वैशाख पौर्णिमेला झाला.
आणखी विशेष बाब म्हणजे तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस सुद्धा वैशाख पौर्णिमा हाच होता.
हे ही वाचा.. बुद्ध पौर्णिमा हिंदू तिथी पंचांगाप्रमाणे येते का?
काय पिंपळ दिवस रात्र हवेत प्राणवायू सोडतो ?
हे ही वाचा.. बिहारच्या डोंगरमाथ्यावर सापडले स्त्रियांच्या निवासासाठी बनवलेले प्राचीन बौद्ध विहार
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 26, 2021 23: 20 PM
WebTitle – Buddha died of which substance? Find out 2021-05-26