नवी दिल्ली : देशात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि इंस्टाग्रामसमोर (Instagram) एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती, जी मुदत 26 मे रोजी पूर्ण होणार आहे.
आतापर्यंत या कंपन्यांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केलेलं नाही. त्यामुळे आता Facebook, Twitter आणि Instagram
हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात 2 दिवसांनंतर बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान आता नव्याने सुरु झालेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo ने
सरकारच्या नियमांचे पालन करण्यास सुरवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
(Twitter, Instagram, facebook can face Trouble after May 26th in India for not accepting government directions)
भारतात सोशल मीडिया वेबसाइट्स इंटरमीडिएट म्हणून काम करतात आणि जर एखादी व्यक्ती सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट किंवा पोस्ट करत असेल तर कोणत्याही सोशल मीडिया कंपनीवर कारवाई होत नाही, कारण त्यांना भारत सरकारकडून मोकळीक मिळते. परंतु जर एनडी टीव्ही इंडिया ने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर, असे समजते की, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामला सरकारने जी मोकळीक दिलीय, ती 26 मे रोजी संपणार आहे.
26 मे पर्यंत या सूचना मान्य न केल्यास सरकार संबंधित सोशल मीडिया साईट्स बंद करु शकते.
भविष्यात कोणताही युजर संबंधित सोशल मीडिया साइटवर आक्षेपार्ह पोस्ट करत असेल तर
त्या युजरसह संबंधित सोशल मीडिया साइटवर कारवाई केली जाऊ शकते.
काय आहेत सरकारचे आदेश?
25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिन्यांच्या आत काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश भारत सरकारच्या गॅझेटमध्येही प्रकाशित केले गेले होते. आदेशानुसार, सोशल मीडिया कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले गेले होते. तसेच हे सर्व अधिकारी भारतात असणे आवश्यक आहे. या आदेशात असेही म्हटले होते की, सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल.
सरकारडून तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती
25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या MEITY ने सर्व सोशल कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिने दिले होते. यामध्ये भारतात आपला अधिकारी आणि कॉंटेक्स अॅड्रेस देणे, अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकाऱ्यांची नेमणूक, तक्रारीचे निवारण, आक्षेपार्ह कंटेंटचे निरीक्षण करणे, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकणे अशा नियमांचा समावेश आहे.
आश्चर्याची विशेष बाब म्हणजे या सूचना नियम यांचे पालन केवळ कू – KOO ही सोशल नेटवर्क साईट फॉलो करत आहे मान्य करत आहे अशी माहिती समजते आहे.आतापर्यंत कू नावाच्या कंपनीशिवाय इतर कोणत्याही कंपनीने या अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही.यात आणखी विशेष बाब अशी की अभिनेत्री कंगणा राणावतने मध्यंतरी ट्विटर आणि इतर सोशल साईटवरुन लोकाना KOO या सोशल प्लॅटफॉर्म वर यावे असे आवाहन केले होते,आणि त्याप्रमाणे तीने स्वत: KOO वर खाते बनवले.
आपल्याला हेही माहीत असलं पाहिजे की समाजात असंतोष निर्माण करणे तेढ निर्माण करणे या कारणासाठी अभिनेत्री कंगणा राणावत हिचे ट्विटर अकाऊंट ट्विटरने कायमचे बॅन केले.तसेच मागील आठवड्यात भाजपकडून कॉँग्रेसवर गंभीर आरोप करण्यात आले. त्यांनी टुलकिट तयार केली असा आरोप करण्यात आला. मात्र नंतर ही टुलकिटच बनावट असल्याचे समोर आले.आणि कॉँग्रेसने यावरून भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा आणि इतर लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
विदेशी मद्याचे ६७ लाख रूपये किंमतीचे ६२५ खोके ट्रकसह जप्त
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 25, 2021 12 : 04 PM
WebTitle –Will Facebook, Twitter and Instagram be shut down in the next 2 days? 2021-05-25