नवी दिल्ली , दि ७ : कोरोना संसर्ग देशभरात बेफाम गतीने वाढत आहे. अनेकांचे प्राण कोरोनाच्या महामारीने घेतले आहेत. कुख्यात गुंड छोटा राजन Chhota Rajan यांचा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे माहिती सुत्रांनी दिली. परंतु एम्सच्या अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळले असून. राजन जिवंत असल्याचं म्हटलं आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यालाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच राजनला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी त्याला एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते.२६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.
आज कोरोनामुळे एम्समध्येच त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु एम्सकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार अधिकाऱ्यांनी छोटा राजन जिवंत असून त्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. राजन सध्या तिहार तुरूंगात शिक्षा भोगत होता.
तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असं आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं.
मात्र लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला.
यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती.
राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं.
मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.
२६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जानेवारी महिन्यात राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांती शिक्षा सुनावली आहे.
पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली.
२०१५ सालच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आलेली.छोटा राजनचं खरं नाव राजेंद्र निकाळजे असं आहे. 2015 साली इंडोनेशियातील बाली येथून राजनला प्रत्यार्पन करून भारतात आणण्यात आलं होतं.तेव्हापासून तो दिल्ल्लीतील तिहार तुरूंगात शिक्षा भोगत आहे.
थायलंड कॉलगर्ल प्रकरण नवा ट्विस्ट,राजकीय नेते अडकण्याची शक्यता
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो.. आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा, ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा.)