I think it is an extra ordinary event in the history of this parliament. I believe in the history of the past legislative assemblies that we should have been engrossed in the discussion of a a single cause for not less than 7 days.
(page 2937 of the record of parliament)
एका कलमावर एवढी प्रदीर्घ चर्चा आजवर कधीच झाली नाही लोकसभेच्या आणि पूर्वीच्या कायदेमंडळाच्या इतिहासातील आश्चर्यकारक घटना असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. हिंदू कोड बिलावरील कलम दोन मध्ये असलेल्या तरतुदी विषयी संसदेत तब्बल सात दिवस चर्चा चालली होती त्यानंतर ते बिल पास झाले.
विवाह आणि घटस्फोट हे वेगवेगळे भाग असू नयेत असे रोहिणी कुमार चौधरी पंडित ठाकुरदास भार्गव यांनी सुचवले होते.
श्री रामलिंगम चेट्टीयार, पंडित गोविंद मालवीय, श्रीमती दुर्गाबाई, सरदार मान इत्यादी सदस्यांनी हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्या विषयावर भाषणे केली.
प्रामुख्याने पंडित गोविंद मालवीय यांनी तब्बल दोन तास 20 मिनिटे भाषण केले.उपसभापतीनी कायदे मंत्र्यांनी याला उत्तर द्यावे असे सुचवले.
तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की,”वरील सर्व सदस्यांच्या व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मला किमान पाच दिवस भाषण करावी लागेल,
आणि त्याला तयारीसाठी टिपण्या काढणे ग्रंथ वगैरेचा ढीग माझ्यापुढे आहे.
उत्तरादाखल मी जे भाषण करीन ते किमान पाच तासांचे असेल”. ( The times of India dated 20-9-51 )
अखिल भारतीय महिला संघ नावाचा महिलांचा एक संघ या हिंदू कोड बिलाच्या विरुद्ध उपोषणास बसला होता.
लोकसभेमध्ये या बिलाबद्दल गोंधळ सुरू होताच लोकसभेच्या बाहेरही अशाच पद्धतीचा गोंधळ सुरू होता.हिंदूंचे नेते स्वामी करपात्री यांनी 18 सप्टेंबरला दिल्लीच्या एका सभेमध्ये भाषण करून सांगितले की,”हिंदू कोड बिल हे हिंदू धर्मशास्त्राचा अपमान करणारे आहे. हिंदूंचा विरोध करणारे आहे. जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्मशास्त्राचे ज्ञान नाही.त्यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल हे टाकून द्यावे, या बिलाचा उपयोग होणार नाही. हे बिल म्हणजे हिंदू धर्मावर ती कायदेशीररित्या घातलेला घाला आहे,आणि अशा प्रकारचा घाला आम्ही कधीही सहन करणार नाही.हिंदू धर्म हाच सनातन आहे आणि सनातन धर्म हा आम्हाला कायम प्रिय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल याद्वारे हिंदू धर्मामध्ये केलेली लुडबूड आहे आणि ती आम्ही कधीही सहन करणार नाही.”
एकीकडे हिंदू समाजातील नेते, पंडित हे सभा घेऊन हिंदू कोड बिलाला विरोध करत होते.तर दुसरीकडे अखिल भारतीय महिला संघ नावाचा महिलांचा एक संघ या हिंदू कोड बिलाच्या विरुद्ध उपोषणास बसला होता.श्रीमती शांता देवी, श्रीमती चिटणीस इत्यादी महिला हिंदू कोड बिलाच्या विरुद्ध उपोषणास बसल्या होत्या. ही त्या काळची आश्चर्यकारक घटना होती.त्याचे कारण असे की हिंदू कोड बिलचा सर्वात जास्त फायदा हिंदू समाजातील स्त्रियांना होता. तरी पण हिंदू समाजातील नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणाने तत्कालीन हिंदू स्त्रियांमध्ये धर्मावरती आलेले हे संकट आहे असे वाटू लागले होते. त्यांचा उद्धार कशात आहे हे ही समजू नये इतकी परिस्थिती बिकट होती.
हिंदू कोड बिलाच्या समर्थनात बाबासाहेब आंबेडकर यांचे तडफदार भाषण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल याबाबत लोकसभेत जे भाषण केले ते भाषण मार्मिक आणि तडफदार होते.
या भाषणामध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा, हिंदू धर्म शास्त्रांचा,तसेच हिंदू धर्मातील तथाकथित नेत्यांचा आणि त्यांच्या खोटेपणाचा आढावा घेतला.
ते भाषण खूप गाजले.त्या भाषणाचा सारांश मी देत आहे.
लोकसभेच्या 20 सप्टेंबर च्या बैठकीत हिंदू कोड बिलाच्या कलम दोनच्या विरोधकांच्या त्यांना उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की,
श्री श्यामाप्रसाद मुखर्जी हे चार वर्षे मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत
किंवा बाहेर इतरत्र कुठेही बिलाला विरोध केला नाही, किंवा तसे भाषण केले नाही.
आता ते विरोधी बाकावरती आहेत त्यामुळे केवळ विरोधासाठी ते विरोध करत आहेत.
हिंदू समाज आणि तुमची संस्कृती जगत आहे खरे,पण लढाईत भाग न घेता जगणाऱ्या भ्याड माणसाप्रमाणे जगत आहे
दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या विरोधामध्ये विचार करण्यासारखा एकही मुद्दा नाही.आजच्या सुधारणेच्या युगात आपण विरोध करणारे लोक स्त्रियांना समान हक्क देण्यास का विरोध करत आहात? जीर्णमतवादी लोक म्हणतात की आमची आर्य संस्कृती थोर आहे. ती भरभक्कम पायावर आमच्या पूर्वजांनी उभी केलेली आहे.आमची संस्कृती हजारो वर्षे टिकून आहे. रोमन ,असीरियन, ईजिप्शियन इत्यादी संस्कृती नष्ट झाल्या. आर्य समाज हा विकसनशील समाज होता म्हणून टिकला.वेळोवेळी ज्या सुधारक कल्पना दुसऱ्याकडून येतील त्या घेऊन आपल्या समाजात ते पचवू शकले.
गौतम बुद्धाने अहिंसा आणि समता या दोन कल्पना प्रस्तुत केल्या त्यातील काही एकच कल्पना हिंदू समाजाला पचवता आली.समानतेची कल्पना पचवता आली नाही. म्हणूनच हिंदू समाजाची शक्ती जातीभेदाने आणि त्यासारख्या रोगांनी दुषित झाली. तुम्ही म्हणता की हिंदू समाज व हिंदू संस्कृती अद्याप टिकून आहे. मी असे म्हणेन की, लढाईत शत्रूचा खात्मा करून जगणारा माणूस आणि लढाईत भाग न घेता जगलेला माणूस यामध्ये खरे जीवन कोण जगतो? तर याचे उत्तर लढाईत शत्रूचा खात्मा केलेला माणूस हेच उत्तर द्यावे लागेल. तुमचा हिंदू समाज आणि तुमची संस्कृती जगत आहे खरे,पण ती लढाईत भाग न घेता जगणाऱ्या भ्याड माणसाप्रमाणे जगत आहे.”
क्रमशः
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 2
हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 3
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 03, 2021 10 : 50 AM
WebTitle – hindu code bill dr b r ambedkar-4 2021-04-03